कोविड संसर्ग सुरू झाल्यापासून जंगल सफारी बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने आता पर्यटक फिरण्यासाठी बाहेर पडत आहेत. जंगल सफारी करण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. मात्र जंगल सफारी करण्यासाठी आलेल्या पर्यटकांना हत्तीच्या रोषाला सामोर जावं लागलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. सफारी ट्रकवर हत्तीने हल्ला चढवल्यानंतर आत बसलेले पर्यटक, गाइड पळून जाताना या व्हिडिओत दिसत आहेत. हा व्हिडिओ लिम्पोपो येथील सेलाटी गेम रिझर्व्हमधला आहे.

जंगल सफारीसाठी पर्यटकांचा गट योजनेनुसार भ्रमंती करत होता. या दरम्यान एक हत्तीचा कळप तिथे आला आणि वाहनावर हल्ला केला. यानंतर ट्रकमध्ये बसलेल्या लोकांची एकच धावपळ उडाली. ट्रकमधून उड्या मारून त्यांनी आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. जंगलात आल्यानंतर गजराज कुणाचं ऐकतील का?. सरळ वाहनावर हल्ला चढवला आणि बाजूला ढकलले. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे.

cat
दुबईमध्ये पुराच्या पाण्यात बुडणाऱ्या मांजरीची जीव वाचवण्यासाठी धडपड! कारच्या दरवाजाला लटकणाऱ्या मांजरीचा थरारक Video Viral
24 tree fall due to unseasonal rain in pimpri chinchwad
पिंपरी : अवकाळी पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यामुळे २४ ठिकाणी झाडपडीच्या घटना
Operation Nanhe Farishte 1064 children were rescued
‘ऑपरेशन नन्हे फरिश्‍ते’ काय आहे माहितीये का? मायेला मुकलेल्या चिमुकल्यांना…
fire workers huts at Mira road
मिरारोड येथे कामगारांच्या झोपड्यांना भीषण आग, चार सिलेंडरचा स्फोट; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

हा व्हिडिओपासून नेटकरी आपल्या अंदाजात कमेंट्स करत आहेत. हत्ती हा शक्तिशाली प्राणी असून त्याच्या वाटेला जाऊ नका, असाही सल्ला काही जणांनी दिला आहे.