Viral Video: सोशल मीडियावर कधी कुठलं गाणं मोठ्या प्रमाणात चर्चेत येईल, हे सांगता येत नाही. या चर्चेत असलेल्या गाण्यांवर प्रत्येक वयोगटातील लोक मोठमोठे कलाकारही ठेका धरताना दिसतात. हल्ली कधी ‘स्वप्नात आली राणी मुखर्जी’, हे गाणं तर कधी ‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’ ही गाणी खूप चर्चेत आहेत, ज्यावर लाखो युजर्स रील्स बनवताना दिसत आहेत. आताही असाच एक नव्या गाण्यावरील व्हिडीओ व्हायरल होतोय.
आपल्या देशातील अनेक प्रकारची पारंपरिक नृत्ये प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तरी जिल्हा किंवा विभागानुसार वेगवेगळी परंपरा पाहायला मिळते. प्रत्येक जिल्हा किंवा विभागातील जेवण, भाषा आणि नृत्यकला यांमध्ये वेगळेपण दिसून येते. महाराष्ट्रात खानदेश हा असा एक प्रदेश आहे की, तेथील खानदेशी जेवण आणि खानदेशी नृत्य विशेष प्रसिद्ध आहे. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुणी ‘देख तुनी बायको कशी नाची रायनी कशी कुदी रायनी कशी डोली रायनी’ या खानदेशी गाण्यावर डान्स करत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी ‘देख तुनी बायको कशी नाची रायनी’ या खानदेशी गाण्यावर सुंदर डान्स करताना दिसतेय. त्यावेळी डान्ससह ती सुंदर अभिनयही करताना दिसतेय. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @srushti_zemse_32 या अकाउंटवरू शेअर करण्यात आला आहे आणि त्या व्हिडीओला आतापर्यंत एक दशलक्षहून अधिक व्ह्युज आणि लाखो लाइक्सही मिळाल्या आहेत. युजर्सही या व्हिडीओवर अनेक कमेंट्स करत आहेत. एकानं लिहिलंय, “मी वाट बघत होतो ह्या गाण्याची”, तर दुसऱ्यानं लिहिलंय, “रांगड्या खानदेशी लोकगीताला तिखट, झणझणीत तडका”, तर तिसऱ्यानं लिहिलंय, “किती सुंदर”.