Viral Video: लावणी हा आपल्या महाराष्ट्रातील लोकप्रिय लोककलेचा प्रकार आहे. महाराष्ट्राची शान म्हणून लावणी नृत्य ओळखले जाते. त्यामध्ये संगीत, नृत्य व गीत यांचा मिलाफ साधलेला असतो. लावणी नृत्यामध्ये कलाकार पायांत घुंगरू बांधून, ढोलकीच्या तालावर ते सादर करतात. सोशल मीडियावर अनेक जण ही मराठी लोककला सादर करताना दिसतात. लावणीच्या विविध गाण्यांवर नृत्य करताना दिसतात. दरम्यान, आता एका मुलीने सादर केलेल्या लावणीचा एक जबरदस्त व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
हल्ली सोशल मीडियावर अनेक महिला कलाकारांच्या लावणी नृत्याचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. परंतु, या व्हिडीओंपैकी काही व्हिडीओंमध्ये काही महिला लावणीच्या नावाखाली त्यांच्या नृत्यातून केवळ अश्लील हावभावच दाखविताना दिसतात. फार कमी महिला त्यांच्या व्हिडीओतून साध्या व सुंदर पद्धतीने पारंपरिक लावणी सादर करतात; ज्यात कोणत्याही अश्लीलतेऐवजी सुंदर हावभाव आणि स्टेप्सचे दर्शन झाले. आता असाच एक भन्नाट व्हिडीओ समोर आलाय की, जो तुम्ही आवडीने पाहाल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक लहान चिमुकली संपूर्ण साजशृंगार करून, लावणीचा तोडा सादर करीत आहे. लावणीचा तोडा सादर करताना त्या मुलीच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि डान्स स्टेप्स पाहून समोर उभे असलेले प्रेक्षकही तिला दाद देताना दिसत आहेत. त्याशिवाय तिच्या या व्हिडीओवरही नेटकरी तिचं कौतुक करताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @kavyagaurii या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्युज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच लाखो लाइक्सही मिळाल्या आहेत. युजर्सही या व्हिडीओवर अनेक कमेंट्स करत आहेत. एकानं लिहिलंय, “तुझ्या डान्सला काव्या तोडच नाही”, तर दुसऱ्यानं लिहिलंय, “तुझा व्हिडीओ कितीही वेळा बघितला तरी मन भरत नाही. एकदम पारंपरिक ठसकेबाज लावणी”, तर तिसऱ्यानं लिहिलंय, “किती सुंदर नाचली.”