जगभरात भारतीय संस्कृतीचा बोलबाला आहे. भारतातील विविधतेतील एकता, भाषा, कला, साहित्य, खाद्यसंस्कृती याबाबत विदेशी लोकांमध्ये कायम कुतूहल असतं. यासोबतच ते आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा भारतीय संस्कृतीबाबत अनेक गोष्टी शिकवत असतात. याचेच एक उत्तम तिचकंच गोंडस उदाहरण देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये कोरियातील एक आई आपल्याला मुलगा चक्क भारतीय राष्ट्रगीत शिकवताना दिसत आहे. आईकडून राष्ट्रगीत शिकल्यानंतर मुलगा सुद्धा आपल्या गोंडस स्टाईलमध्ये ‘जन-गण-मन’ म्हणतो. हा व्हिडीओ पाहून तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल, हे मात्र नक्की.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्या कोरियन आईचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे, तिचं नाव किम असं आहे. ती कोरियन वंशाची आहे, पण तिचा नवरा भारतीय आहे. ते दक्षिण कोरियामध्ये मुलासोबत राहतात. त्यांच्या मुलाला ते कोरियन आणि भारतीय अशा दोन्ही संस्कृती शिकून मोठं करत आहे. या कोरियन आईने आपल्याला भारतीय राष्ट्रगीत सुद्धा शिकवले. यावेळी ती स्वतः भारतीय राष्ट्रगीत गाताना दिसून येते. आईपाठोपाठ मुलगा सुद्धा राष्ट्रगीत म्हणताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने भरून येईल. यासाठी हा व्हिडीओ एकदा जरूर पाहा. खरंच हे दृश्य अप्रतिम आहे.

आणखी वाचा : नाशिक हादरलं….मैत्रीला नकार दिला म्हणून दिवसाढवळ्या पेट्रोल पंच कर्मचारी महिलेवर केला चाकूने वार, घटनेचा VIDEO VIRAL

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : Ganesh Chaturthi 2022: ३५६ वर्षे जुन्या या अद्भूत मंदिरात मुर्ती अनेकवेळा समुद्रात फेकल्यानंतरही परतून येत होती…

या व्हिडीओमध्ये मुलगा अगदी गोंडसपणे राष्ट्रगीतातील एक-एक शब्द अगदी स्पष्टपणे उच्चारण्याचा प्रयत्न करताना दिसतो.,त्याच्या आईने बोललेले शब्द पुन्हा पुन्हा म्हणतो आणि शेवटी उभं राहून जय हिंद म्हणतो. यानंतर किम शेवटी टाळ्या वाजवून त्याचं कौतुक करताना दिसत आहे. एका यूजरने लिहिले, भारताकडून कोरियावर खूप प्रेम. दुसऱ्या युजरने लिहिले की, आम्हाला तुमचा अभिमान आहे. किम अनेकदा तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून मजेदार, मनोरंजक, प्रेरणादायी व्हिडीओ, फोटो पोस्ट करत असते.

आणखी वाचा : Dosa Printer: कधी विचार केला होता का? ‘डोसा प्रिंटर’ही येईल, VIRAL VIDEO पाहून लोक थक्क झाले

हा व्हायरल व्हिडीओ ‘पॅम किम फॉरएव्हर’ नावाच्या इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर करण्यात आला होता. गेल्या आठवड्यात स्वातंत्र्यदिनी हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. त्यानंतर बघता बघता हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर होऊ लागला. या व्हिडीओला आतापर्यंत सहा लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला असून यूजर्स किम आणि तिच्या मुलाचे कौतुक करत आहेत. जवळपास १ लाखांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. नेटकरी हा व्हिडीओ इतर पालक आणि मुलांसाठी प्रेरणादायी असल्याचं सांगत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video korean woman teaches jana gana mana to her son desis feel proud watch prp
First published on: 26-08-2022 at 15:17 IST