वृत्तसंस्था, टोरंटो

विदित गुजराथीने आपली आणि भारतीय बुद्धिबळाची ताकद अधोरेखित करताना ‘कॅन्डिडेट्स’ म्हणजेच आव्हानवीरांच्या बुद्धिबळ स्पर्धेत दुसऱ्याच फेरीत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या अमेरिकेच्या हिकारू नाकामुराला पराभवाचा धक्का दिला. नाकामुराकडे संभाव्य विजेता म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे विदितचा हा विजय खूप मोठा मानला जात आहे.

raj thackeray amit shah (
भाजपाने मनसेला नेमकी काय ऑफर दिलेली? राज ठाकरे म्हणाले, “त्यांनी मला सांगितलं…”
rajnath singh rahul gandhi mahendra singh dhoni
“राहुल गांधी राजकारणातले एमएस धोनी”, राजनाथ सिंह यांनी केली तुलना; म्हणाले, “मी कधी कधी विचार करतो…”
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Shiv Sena Thackeray Group Leader Chandrakant Khaire Announces His Political Retirement
मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंनी केली राजकीय निवृत्तीची घोषणा, म्हणाले, “अंबादास दानवे..”

दुसरीकडे, दोन भारतीय ग्रँडमास्टर बुद्धिबळपटूंमध्ये झालेल्या लढतीत डी. गुकेशने आर. प्रज्ञानंदला पराभूत केले. त्याच वेळी महिलांमध्ये आर. वैशालीला पराभवाचा सामना करावा लागला, तर कोनेरू हम्पीला सलग दुसऱ्या बरोबरीवर समाधान मानावे लागले.

खुल्या विभागात पहिल्या फेरीतील चारही लढती बरोबरीत राहिल्या होत्या. दुसऱ्या फेरीत मात्र चारही लढती निर्णायक ठरल्या. अग्रमानांकित फॅबियानो कारुआनाने निजात अबासोववर अगदी सहज मात केली. इयान नेपेम्नियाशीने फ्रान्सच्या अलिरेझा फिरुझाचा पराभव केला. खुल्या विभागात विदित, कारुआना, नेपोम्नियाशी आणि गुकेश प्रत्येकी १.५ गुणांसह संयुक्त आघाडीवर आहेत.

हेही वाचा >>>IPL 2024, RR vs RCB : विराट कोहलीने रचला इतिहास! राजस्थान रॉयल्सविरुद्ध झळकावले पहिले शतक

महिला विभागात वैशालीला चीनच्या टॅन झोंगीविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. रशियाच्या अ‍ॅलेक्झांड्रा गोर्याचकिनाने अ‍ॅना मुझिचुकला पराभूत केले. अन्य लढतीत हम्पीने सलग दुसऱ्या लढतीत बरोबरी मान्य केली. तिला कॅटेरिना लायनोने रोखले. नुरग्युल सलिमोवा आणि ले टिंगजी यांच्यातील लढत बरोबरीत सुटली. महिला विभागात टॅन दोन गुणांसह आघाडीवर आहे.

खुल्या विभागात नाकामुराविरुद्ध विदितची कामगिरी लक्षवेधी ठरली. सलग दुसऱ्या डावात काळय़ा मोहऱ्यांसह खेळताना विदितने या वेळी बर्लिन पद्धतीला पसंती दिली.

विदितच्या काहीशा चकित करणाऱ्या चालींनी नाकामुराला दडपणाखाली आणले. अवघ्या तीन चालींनंतर विदितने घोडय़ाचे बलिदान देताना नाकामुराला गोंधळात टाकले. त्यानंतर विदितने आक्रमक चाली रचत अवघ्या २९व्या चालीला नाकामुराला पराभूत केले. ‘उत्तम खेळलास,’ असे म्हणत लढतीनंतर नाकामुराने विदितच्या कामगिरीचे कौतुक केले.

हेही वाचा >>>IPL 2024, RR vs RCB : बटलरचं शतक कोहलीच्या शतकावर भारी, राजस्थानने साकारला बंगळुरूवर विजय

अन्य लढतीत, गुकेशविरुद्ध प्रज्ञानंदने कॅटलान पद्धतीने सुरुवात केली व पटावरील स्थिती क्लिष्ट केली. गुकेशला योग्य चालींसाठी विचार करावा लागत होता. मात्र, काही चालींनंतर तो स्थिरावला. त्याच वेळी प्रज्ञानंदकडून चूक झाली व याचा फायदा घेत गुकेशने ३३ चालींत विजय मिळवला.

दुसऱ्या फेरीचे निकाल

खुला विभाग : इयान नेपोम्नियाशी विजयी वि. अलिरेझा फिरुझा, हिकारू नाकामुरा पराभूत वि. विदित गुजराथी, फॅबियानो कारुआना विजयी वि. निजात अबासोव, आर. प्रज्ञानंद पराभूत वि. डी. गुकेश.

महिला : टॅन झोंगी विजयी वि. आर. वैशाली, कॅटेरिना लायनो बरोबरी वि. कोनेरू हम्पी, नुरग्युल सलिमोवा बरोबरी वि. ले टिंगजी, अलेक्झांड्रा गोर्याचकिना विजयी वि. अ‍ॅना मुझिचुक.

विदितसाठी हा खूप मोठा विजय होता. पारंपरिक (क्लासिकल) प्रकारात नाकामुरा यापूर्वीच्या ४७ सामन्यांत अपराजित राहिला होता. त्याला मॅग्नस कार्लसनही पराभूत करू शकला नव्हता. तसेच जलद आणि अतिजलद प्रकाराच्या बुद्धिबळात नाकामुराने यापूर्वी विदितचा अनेकदा पराभव केला होता. नाकामुराने भारतात येऊन टाटा स्टील स्पर्धेतही विदितवर मात केली होती. त्यामुळे ‘कॅन्डिडेट्स’मधील या सामन्यात नाकामुरा थोडा गाफील राहिला. याचा विदितने पुरेपूर फायदा घेतला. नाकामुराने दिलेली संधी विदितने सोडली नाही. त्यामुळे त्याचे कौतुक झाले पाहिजे. – रघुनंदन गोखले, बुद्धिबळ प्रशिक्षक