सोशल मीडियावर वेगवेगळ्या व्हिडीओंचा जणू खजिनाच पहायला मिळतो. काही व्हिडीओमधून लोकांचं टॅलेंट पाहून आश्चर्य वाटू लागतं. असं म्हणतात, आपल्या भारतात टॅलेंटेड लोकांची काही कमी नाही. भारतीयांच्या टॅलेंटची बरोबरी कुणी करू शकत नाही. याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती चक्क चालत्या ट्रेडमिलवर जबरदस्त डान्स परफॉर्मन्स करताना दिसतोय. हा डान्स पाहून तुम्ही सुद्धा अचंबित व्हाल. असाच एक व्हिडीओ इंटरनेटवर समोर आला आहे, ज्यामध्ये एक तरुण चालत्या ट्रेडमिलवर मस्त डान्स करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरूण चालत्या ट्रेडमिलवर डान्स करताना दिसतोय. ‘कभी खुशी कभी गम’ चे सुपरपॉप्युलर गाणे ‘बोले चुडियां’ या गाण्यावर तो थिरकताना दिसतोय. या गाण्यावर डान्स करताना त्याचे डान्स मूव्ह पाहून सारेज जण थक्क झाले आहेत. बॉलिवूडमधल्या बड्या बड्या अभिनेत्रीही फिक्या पडतील इतका अप्रतिम डान्स या तरूणाने सादर केलाय. त्याच्या मूव्ह इतक्या अप्रतिम आहेत की त्याच्याकडे बघताना लोकांची नजर एका सेकंदासाठीही हटत नाही. त्याचा अप्रतिम डान्स पाहून तिथे पाहणारे लोकही टाळ्या वाजवत आहेत.

आणखी वाचा : स्मोकिंग करणारा पक्षी तुम्ही कधी पाहिलाय का? मग हा VIRAL VIDEO एकदा पाहाच!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : पिटबुलने स्विमिंग पूलमध्ये बुडणाऱ्या पिल्लाला वाचवलं, कसं ते पाहा हा VIRAL VIDEO

हा डान्स व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही नक्कीच आश्चर्य वाटेल. त्याच्या नृत्यात अनेक उत्तम मूव्ह आहेत की ते करताना चांगले डान्सरही घाम गाळतात, पण त्या व्यक्तीसाठी त्या मूव्हज सहज झालेल्या आहेत. असा डान्स रोज बघायला मिळत नाही. हा डान्सिंग व्हिडीओ alok_speed_b_boy नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ बघता बघता व्हायरल देखील झाला. हा व्हिडीओ एकदा पाहून लोकांचं मन भरत नाही. या व्हिडीओला आतापर्यंत ३४ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर दोन हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.