Viral Video: सोशल मीडियावर मनोरंजन करणाऱ्या व्हिडीओंसह अनेकदा थरकाप उडवणारे व्हिडीओही मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. त्यातील काही व्हिडीओ इतके भयानक असतात की, जे पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो. या व्हिडीओंमध्ये प्राण्यांच्या व्हिडीओंना सर्वाधिक पसंती दिली जाते. जंगलातील हिंस्र प्राणी कशी शिकार करतात, शिकार करण्यासाठी कशी युक्ती लढवतात हे पाहण्यासाठी लोक उत्सुक असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून अनेक जण अवाक् झाले आहेत.
जगातील प्रत्येक सजीव आपली भूक भागवण्यासाठी संघर्ष करीत असतो. हिंस्त्र प्राणी आपली भूक भागविण्यासाठी जंगलातील इतर प्राण्यांची शिकार करताना दिसतात. बऱ्याचदा शिकार करण्यासाठी ते रात्रीच्या वेळी जंगलातून बाहेर येऊन मानवी वस्तीत शिरकाव करतात. त्यावेळी ते श्वान, तर कधी गाई, म्हशींवर हल्ला करतात. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दोन सिंहांनी मानवी वस्तीमध्ये प्रवेश केल्याचे दिसत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रात्रीच्या वेळी काही पाच गाई वेगाने धावत दुसऱ्या दिशेला जातात. त्यानंतर त्यांच्यामागे असलेल्या श्वानांनाही कसली तरी चाहूल लागते. त्यामुळे तेदेखील वेगाने धावतात. इतक्यात अंधारातून एक सिंह येतो आणि शिकारीसाठी तो गाई गेलेल्या दिशेने जातो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @lionofgir595 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत अनेक व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक जण कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत. एकाने लिहिलेय, “जंगल तोडल्यामुळे तो गावात आला”. दुसऱ्याने लिहिलेय, “बापरे पुढे काय झालं असेल”. तिसऱ्याने लिहिलेय, “गाई स्वतःचा जीव मुठीत घेऊन पळत आहेत”.