scorecardresearch

कौतुकास्पद! धरणाच्या पाण्यात अडकलेल्या कुत्र्याला वाचवण्यासाठी केले शर्थीचे प्रयत्न; शेवटी…

Viral Video: माणुसकी अजुनही जिवंत आहे याचा प्रत्येय येणारा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय

कौतुकास्पद! धरणाच्या पाण्यात अडकलेल्या कुत्र्याला वाचवण्यासाठी केले शर्थीचे प्रयत्न; शेवटी…
व्हायरल व्हिडीओ (फोटो: सोशल मीडिया)

‘आजकालच्या जगात माणुसकी लोप पावत चालली आहे’, ‘माणूस माणसाच्याही मदतीला धावून जात नाही’ अशी अनेक वाक्य तुम्ही जेष्ठ मंडळींकडुन ऐकली असतील. याचा प्रत्येय येणाऱ्या अनेक घटनांचा अनुभवही तुम्ही प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या घेतला असेल. पण सध्या व्हायरल होणारा व्हिडीओमध्ये याच्या अगदी उलट घडत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एका कुत्र्याला वाचवण्यासाठी माणसाने स्वतःचा जीव धोक्यात घातला असल्याचे दिसत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक कुत्रा धरणाच्या पाण्यात अडकलेला दिसत आहे. त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न तिथे उपस्थित असणारे लोक करतात, त्यातील एक माणूस तर चक्क कडेवरून खाली उतरत स्वतःचा जीव धोक्यात घालत कुत्र्याला मदतीचा हात देतो. सुरूवातीला कुत्रा घाबरला असल्याचे दिसते. पण नंतर त्याच्या मदतीसाठी हे प्रयत्न सुरू असल्याचे लक्षात येताच तो पाण्यात पुढे येऊन त्या माणसाजवळ जातो. तो माणूस त्याला ओढत पाण्यातून बाहेर काढतो. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा- Video: वाळवंटात राहणारा उंट जेव्हा बर्फाळ प्रदेशात पहिल्यांदा जातो; मन जिंकणारी त्याची प्रतिक्रिया एकदा पाहाच

व्हायरल व्हिडीओ:

आणखी वाचा- शिकार केलेल्या सश्यासोबत खेळू लागला गरुड; उंचावरून खाली टाकले अन्…; पाहा थक्क करणारा Viral Video

या व्हिडीओने नेटकऱ्यांची मनं जिंकली असून, कुत्र्याची मदत करणाऱ्या या माणसावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या व्हिडीओला दीड लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-12-2022 at 21:30 IST

संबंधित बातम्या