करावे तसे भरावे ही म्हणावे ही म्हण आपल्याला इयत्ता ४ थीमध्ये आपण शिकलेली आहे. अनेकदा आपण प्राणी किंवा माणसाचं वाईट चिंतायला अथवा करायला जातो आणि तसाच प्रकार पुन्हा आपल्यासोबत घडतो ज्याला आपण ज्याचं जसं कर्म तसं फळ असं म्हणतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर वाईट केल्यावर वाईटच होतं. याचं ताजं उदाहरण देणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस उडणाऱ्या पक्ष्याला लाथ मारायला निघाला होता. पण त्याच्या कर्माचं फळ थेट 5G च्या स्पीडनं त्याला परत मिळालं. हा VIRAL VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल, ‘याला म्हणतात कर्म!’
हे खरंय की, आपण जसं काम करतो त्याच पद्धतीचं फळ आपल्याला मिळत असतं. आता तुम्ही व्हायरल व्हिडीओ पाहाच. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माणूस धावत येताना दिसून येत आहे. हा माणूस रस्त्यावर बसलेल्या एका पक्ष्याच्या दिशेने धावत येताना दिसतो. त्याला येताना पाहून तो पक्षी उडण्याचा प्रयत्न करतो आणि तितक्यात हा माणूस त्याच्या जवळ जाऊन या उडणाऱ्या पक्ष्याला लाथ मारण्याचा प्रयत्न करतो. पण यात तो अयशस्वी होतो आणि सोबतच पुढच्याही क्षणातच त्याला त्याच्या कर्माचं फळही मिळतं. पुढच्या काही सेकंदात या स्टोरीमध्ये एक मोठा ट्विस्ट येतो.
यापुढे जे होते ते पाहून तुम्हाला हसू येईल. तो माणूस उडणाऱ्या पक्ष्याला लाथ मारण्यासाठी सर्व शक्ती एकवटून ज्या गतीने तो धावत येतो त्याच गतीत तो पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या एका कचऱ्याच्या डब्ब्याला धाडकन जाऊन कोसळतो. त्याच्याच कर्मानं त्याला अशी अद्दल घडवली की यापुढे कोणत्या मुक्या प्राण्याला मारताना तो शंभर वेळा विचार करेल. त्यानंतर तो ज्या पद्धतीने त्याचं डोकं डब्ब्याला आदळतं ते पाहून असं वाटत आहे की पुढचा एक आठवडा तर तो उठू शकणार नाही. उडणाऱ्या पक्ष्याला त्रास देण्याचा नादात या व्यक्तीने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली.
आणखी वाचा : वयाच्या ६० व्या वर्षी बनवलेली अशी सुंदर बॉडी, पाहून तरुणही लाजतील!
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : VIRAL VIDEO : जेवताना अचानक घास घशात अडकला, हॉटेलच्या महिला वेटरने वाचवला जीव
Instant Karma नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ लोकांना फार आवडू लागलाय. लोक या व्हिडीओचा भरपूर आनंद घेताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक तो पुढे सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्वर शेअर करण्याचा मोह आवरू शकत नाहीत. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालायी की आतापर्यंत या व्हिडीओला ५ लाख १४ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर १० हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. युजर्सचा प्रतिसाद पाहता पक्ष्यावर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीचा निकाल पाहून त्यांना एकप्रकारचे समाधान मिळाल्याचे दिसते. यावरच्या प्रतिक्रिया देखील वाचण्यायोग्य आहेत.