सोशल मीडियावर दररोज नवीन आणि कधीकधी अत्यंत विचित्र गोष्टी पाहायला मिळतात. अशा गोष्टी ज्याबाबत आपण कधी स्वप्नातही विचार केला नसेल. इंटरनेटवर मजेशीर व्हिडीओ आढळतात, जे लोकांना पुन्हा पुन्हा पहायला आवडतात. साप हा असा प्राणी आहे ज्याला पाहिल्यावर भले भले घाबरतात. पण, सध्या सापाचा एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे जे पाहून तुम्ही त्याला पाहून घाबरणार नाहीत, तर त्यांच्या सौंदर्याने घायाळ व्हाल. हा व्हिडीओ नेटकरींच्या खूप पसंतीस पडत आहे आणि युजर्स या व्हिडीओचा आनंद घेत मजेदार प्रतिक्रिया देखील देत आहेत. नेमकं असं या सापामध्ये आहे तरी काय ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. हे जाणून घेण्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

समोर साप येताच कुणीही घाबरणे साहाजिकच आहे. कारण, तो ज्याप्रकारे टक लावून पाहतो ते पाहून कोणालाही भीती वाटेल. मात्र, या व्हिडीओमध्ये तुम्हाला सापाचं सौंदर्य पाहून नेटकरी घायाळ होत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक अत्यंत दुर्मिळ काळ्या आणि पिवळ्या रंगाचा साप दिसून येतोय. हा साप जेव्हा जमिनीवर सरपटतो त्यावेळी त्यांच्या अंगावर काळ्या आणि पिवळ्या रंगाची पट्टेदार आकृती साऱ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे. फूट ते दीड फूट लांब आणि पातळ शरीर तसंच निमुळते शेपूट असलेला हा आकर्षक साप पाहून पाहणारे केवळ पाहत राहतात.

एका खडकाळ पृष्ठभागावरून हा साप सरपटत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हे पाहून कुणालाही याच्या सौंदर्याची भुरळ पडेल. या सुंदर सापाचा व्हिडीओ IFS प्रवीण कासवणे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसंच या सापाबद्दल कुणाला माहिती आहे का, असं सवाल देखील त्यांनी कॅप्शनमध्ये विचारला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना या सापाबाबत जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. प्रत्येकजण या व्हिडीओखालील कमेंट्स सेक्शनमध्ये या सापाबाबत माहिती देण्यासाठी विनंती करत होते. त्यानंतर स्वतः प्रवीण कासवणे यांनी या सापाबाबत माहिती शेअर केली.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : नऊ महिन्याच्या बाळाचे ‘हे’ पहिले शब्द ऐकून फक्त पालक नव्हे तर तुम्ही सुद्धा चकित व्हाल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : स्टंट करण्याच्या नादात तोंडावरच आपटला, VIRAL VIDEO पाहून नेटकरी हादरले…

सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या या सापाचं नाव ब्रँडेड क्रेट असं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ भारतातलाच आहे. भारतात एका खडकाळ भागात हा ब्रॅंडेक केट जातीचा साप आढळून आला आहे. दक्षिणपूर्व आशियामध्ये आणि दक्षिण चीनमध्ये सुद्धा हा साप आढळून येत असतो. हा साप लाजाळू आहे, प्रामुख्याने निशाचर आहे आणि विशेषतः आक्रमक नाही. जितकं हा सापाचं सौंदर्य खुलून दिसतं त्याहूनही घातक या सापाचं विष आहे. दिसायला साप खूपच सुंदर दिसत असला तरी मानवासाठी खूप प्राणघातक आहे. जेव्हा त्रास दिला जातो तेव्हा ते सहसा त्यांचे डोके त्यांच्या कॉइलखाली लपवतात. सामान्यतः ते चावण्याचा प्रयत्न करत नाहीत. रात्रीच्या वेळीस ते जास्त सक्रिय असतात आणि ते अधिक धोकादायक मानले जातात.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : कतरिना कैफच्या ‘चिकनी चमेली’ गाण्यावर दिल्लीतील तरुणीचा जबरदस्त डान्स

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ लोकांना खूपच आवडला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ९२ हजार लोकांनी पाहिलंय. २ हजार पेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाइक केलं आहे. प्रत्येकजण या व्हिडीओखालील कमेंट्स सेक्शनमध्ये सापाच्या सौंदर्याचं कौतुक करताना दिसून येत आहेत.