ब्रुस ली त्याच्या अॅक्शनपटांमुळे कायमच चर्चेत असतो. त्याचे अनेक अॅक्शनपटही जगभरात मोठ्या प्रमाणात गाजले आहेत. त्याच्या अॅथलॅटीक्सची जगात कोणाशीच तुलना होऊ शकत नाही. मार्शल आर्टचा प्रणेता म्हणून त्याची असणारी ओळख आजही कायम आहे. या जगातील मार्शल आर्ट आयकॉन म्हणून ओळख असणाऱ्या ब्रुस लीचा एक दुर्मिळ व्हिडिओ नुकताच सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ब्रुस लीचा त्याच्या विद्यार्थ्यांबरोबर मिक्स मार्शल करतानाचे रेकॉर्डिंग युट्यूबवर व्हायरल होत आहे.

आतापर्यंत सिनेमात फक्त ब्रुस लीला मार्शल आर्ट करताना पाहिलं असेल. पण हा व्हिडिओ मात्र फारच दुर्मिळ असून रिअल लाईफमध्ये मार्शल आर्ट करतानाचा तो एकमेव व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात आला आहे. यात ब्रुस ली आपल्या विद्यार्थ्यांना धडे देताना दिसत आहेत. विद्युत वेगाने हल्ला करणारे ब्रुस ली याने किती प्रावीण्य मिळवलं हे सहज दिसून येत आहे. तेव्हा अॅक्शन हिरो म्हणून जागलेला, मार्शल आर्टचा प्रणेता म्हणवला गेलेल्या ब्रुस लीची एकमेव खरी फाईट असल्याची आणि ती रेकॉर्ड झाल्याची गोष्ट त्याच्या चाहत्यांना आनंद देणारीच आहे.

ब्रुस लीने आपल्या अजब ‘कुंग फू फाइट’ शैलीतून अगदी कमी कालावधीत प्रेक्षकांची मने जिंकली. पुढे याच ‘ब्रुस ली’च्या फाइट शैलीचे अनुकरण करत जॅकी चॅन, जेट ली, डोनी येन, नीना ली यांसारखे अनेक अभिनेते ‘अ‍ॅक्शन स्टार’ म्हणून नावारूपाला आले. ब्रुस लीच्या आयुष्यावर ‘द ग्रँड मास्टर’ आणि ‘आयपी मॅन’ हे दोन चित्रपट येऊन गेले आहेत; परंतु हे दोन्ही चित्रपट त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अगदी वरवर डोकावून गेले आहेत. ब्रुस लीने ‘द किड’, ‘द बिग बॉस’, ‘फिस्ट ऑफ फ्यूरी’, ‘वे ऑफ द ड्रॅगन’ अशा ४१ चित्रपटांतून काम केले आहे.