scorecardresearch

खोलीत महाकाय अजगराशी खेळत होती चिमुरडी, VIRAL VIDEO पाहून सारेच जण हैराण

सापाचं नुसतं नाव जरी काढलं तरी अंगावर काटा येतो. पण या व्हायरल व्हिडीओमधली मुलगी चक्क महाकाय अजगरासोबत खेळताना दिसून आली. पाहा हा व्हायरल व्हिडीओ…

girl-playing-giant-python
(Photo: Instagram/ snake_unity)

जर आपण सर्वात धोकादायक प्राण्यांची यादी तयार केली तर त्यात सापांचे नाव सर्वात आधी येतं. विषारी सापांच्या हल्ल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, जे प्रेक्षकांना खूप आश्चर्यचकित करतात. काही व्हिडीओ इतके भयानक आहेत की ते पाहून नुसतं सापाचं नाव जरी निघालं तरी घाबरगुंडी उडते. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा मुलीचा व्हिडीओ दाखवणार आहोत जी महाकाय अजगराला अजिबात घाबरत नाही. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगी महाकाय अजगराला न घाबरता त्याला हाताने धरून रिकाम्या खोलीत त्याच्यासोबत खेळताना दिसून आली . हा व्हिडीओ पाहून प्रेक्षक थक्क झाले आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक लहान मुलगी एका पिवळ्या रंगाच्या अजगराला घेऊन बसलेली दिसत आहे. छोट्याश्या सापापासूनही लहान मुले घाबरून पळून जातात., मात्र व्हायरल होत असलेला हा व्हिडीओमध्ये एवढ्या मोठ्या अजगराला पाहून मुलीच्या मनात कोणतीही भीती दिसून आलेली नाही. ही लहान मुलगी पुन्हा पुन्हा अजगराशी खेळत आहे आणि आनंदाने हसत आहे. एवढंच नाही तर या अजगराने मुलीच्या चेहऱ्याला स्पर्श केला तरी ही चिमुकली घाबरत नाही आणि त्याच्याशी खेळत राहते. मात्र, व्हिडीओ पाहणारे हे दृश्य पाहून हैराण झाले आहेत.

आणखी वाचा : Kala Angoor : ‘कच्चा बादाम’ पाठोपाठ आता ‘काला अंगूर’ गाणं होतंय VIRAL

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : बाप हा बापच असतो! लेकाच्या आनंदासाठी वडिलांनी बनवला लाकडी रणगाडा, पाहा VIRAL VIDEO

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म snake_unity वर पोस्ट करण्यात आला आहे, जो आतापर्यंत शेकडो लोकांनी पाहिला आहे आणि हजारो लोकांनी या व्हिडीओला लाईक देखील केलं आहे. हा हृदयस्पर्शी व्हिडीओ प्रेक्षकांना खूप आवडला आहे आणि तो त्यांच्या मित्रांसोबतही मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक या व्हिडीओच्या कमेंट्स सेक्शनमध्ये प्रतिक्रिया देण्यावाचून राहत नाहीत. एका युजरने कमेंट्स सेक्शनमध्ये लिहिलं की, “मुलांना एकटं सोडू नका”. आणखी एका दुसऱ्या युजरने लिहिलं की, “खूप भयानक व्हिडीओ आहे.” हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल, हे मात्र नक्की.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video of little girl was playing with giant python in everyone shocked after watch video prp

ताज्या बातम्या