scorecardresearch

फक्त माणूसच नाही तर प्राणीसुद्धा एकमेकांची मदत करतात, हा VIRAL VIDEO पाहून भावूक व्हाल

ज्याप्रमाणे माणसं मैत्री निभवणं चांगलंच जाणून असतात, तसंच प्राणीसुद्धा मैत्रीचे भाव जपतात. संकटकाळी ते सुद्धा आपल्या साथीदाराला मदतीसाठी धावून येतात. असाच हा एक व्हिडीओ सध्या लोकांना खूपच भावला आहे.

Otters-Viral-Video
(Photo: Twitter/ AwanishSharan )

प्राणी असो वा मनुष्य… जर कुणी संकटात सापडलं तर मदतीसाठी त्यांचे साथीदार धावून येतात. सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओंचं व्यासपीठ आहे. रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. प्राण्यांबद्दल नेटकऱ्यांना कायमच कुतुहूल असतं. प्राणी कसे जगतात, काय करतात याबाबत उत्सुकता असते. ज्याप्रमाणे माणसं मैत्री निभवणं चांगलंच जाणून असतात, तसंच प्राणीसुद्धा मैत्रीचे भाव जपतात. संकटकाळी ते सुद्धा आपल्या साथीदाराला मदतीसाठी धावून येतात. असाच हा एक व्हिडीओ सध्या लोकांना खूपच भावला आहे.

आपल्या ग्रहावरील अनेक प्राण्यांना आयुष्यभर समूहात राहायची सवय असते आणि विशेष म्हणजे हे सामाजिक व्यवहार केवळ माणसांमध्येच नाही तर प्राण्यांमध्येही होतात. मग तो कौटुंबिक असो वा मैत्रीचा किंवा नात्याचा. प्राणी देखील एकमेकांना आधार देण्यासाठी उभे असतात. गटात राहणे त्यांना शिकार करण्यास, एकमेकांचे संरक्षण करण्यास मदत करते, कारण काही प्राण्यांना गटात राहण्यापेक्षा एकटे राहणे अधिक आव्हानात्मक असू शकते. या व्हिडीओ व्हायरलमध्ये सहा बीव्हर दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. या व्हिडीओमध्ये त्यातील तिघे पटकन भिंतीवर चढले, पण धाकट्याला भिंतीच्या उंचीमुळे पटकन चढता आलं नाही.

या बीव्हर्सने एकमेकांना मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. व्हिडीओच्या सुरुवातीला तीन बीव्हर भिंतीच्या वर आधीच चढले आहेत. यानंतर तो त्याच्या सहकारी बीव्हरला वर चढण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करतो. बी्व्हर भींतीवर फरफटताना आणि चढताना दिसतो.

आणखी वाचा : OMG! जेव्हा कांगारू थेट बारमध्ये पोहोचला…, VIRAL VIDEO पाहून नेटिझन्सकडून कमेंट्सचा महापूर

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : Kashmir मध्ये भारतीय लष्कराचे अधिकारी नमाज अदा करताना दिसले, या VIRAL PHOTO ने लोकांची मने जिंकली

आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या पोस्टसोबत त्यांनी कॅप्शन लिहिलं आहे की, “यामुळेच कुटुंब महत्त्वाचं आहे.” व्हिडीओ शेअऱ केल्यानंतर बघता बघता तो सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला. आतापर्यंत या व्हिडीओला ५० हजारांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे आणि ३६ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. यावर लोक वेगवेगळ्या प्रति्क्रिया देताना दिसून येत आहेत. “याला खरी मैत्री म्हणतात”, असं एका सोशल मीडिया यूजरने कमेंट करताना म्हटलं आहे. दुसर्‍या युजरने सांगितलं की “प्राणी जगामध्ये एकतेचे एक उत्तम उदाहरण आहे, ज्याची आज लोकांमध्ये कमतरता आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-04-2022 at 15:54 IST

संबंधित बातम्या