scorecardresearch

I Love You Meri Jan! वर्गात लॉलीपॉप चोखत, व्हिडीओ शूट करत विद्यार्थ्याने शिक्षिकेला मारली हाक; व्हिडीओ व्हायरल

I Love You Meri Jan; विद्यार्थ्यांकडून शिक्षिकेचा छळ, व्हिडीओ व्हायरल

I Love You Meri Jan! वर्गात लॉलीपॉप चोखत, व्हिडीओ शूट करत विद्यार्थ्याने शिक्षिकेला मारली हाक; व्हिडीओ व्हायरल
विद्यार्थ्यांकडून शिक्षिकेचा छळ

उत्तर प्रदेशातील मेरठ येथे तीन विद्यार्थी भरवर्गात शिक्षिकेची छेड काढत त्रास देत असल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. विद्यार्थिनीच हा व्हिडीओ शूट केला आहे. या व्हिडीओत विद्यार्थी शिक्षेकेला चक्क ‘जान’ आणि ‘आय लव्ह यू’ म्हणत असल्याचं ऐकू येत आहे. शिक्षिका मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हिडीओमध्ये विद्यार्थी कॅमेऱ्यात दिसत आहेत. यानंतर ते कॅमेरा शिक्षिकेकडे वळवतात आणि ‘जान’, ‘आय लव्ह यू’ अशा कमेंट करतात. धक्कादायक बाब म्हणजे यावर वर्गातील विद्यार्थिंनी आणि इतर विद्यार्थी हसताना दिसत आहेत. व्हिडीओ शूट होत असल्याने शिक्षिका वहीच्या सहाय्याने चेहरा लपवते. यानंतर वर्गाच्या बाहेरही विद्यार्थी शिक्षिकेवर अशाच कमेंट करत असल्याचंही व्हिडीओत दिसत आहे.

विद्यार्थ्यांनी शिक्षेकेचा छळ करतानाचा व्हिडीओ फक्त शूट केला नाही, तर सोशल मीडियावरही शेअर केला आहे. यानंतर पोलिसांनी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 10:12 IST

संबंधित बातम्या