Viral Video: प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील त्याच्या आई-वडिलांची जागा कोणीच घेऊ शकत नाही. माणूस वयाने कितीही लहान असला किंवा मोठा असला तरी त्याला नेहमीच त्याच्या आई-वडिलांच्या सहवास आणि प्रेमाची ओढ असते. परंतु, अनेकदा हे सुख प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही. काही आई-वडिलांच्या अनैतिक संबंधातून झालेल्या मुलांना किंवा आई-वडिलांच्या निधनामुळे लेकारांना अनाथाश्रमात आयुष्य काढावे लागते. त्यातील काही लेकारांना लोक दत्तकही घेतात. आता अशाच दत्तक घेतलेल्या चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
आपल्या मुलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आई-वडील खूप उत्सुक असतात. मुलांना त्यांच्या आवडीच्या भेटवस्तू देणं, केक आणून मुलांच्या मित्र-मैत्रिणींना बोलावणं. या सर्व गोष्टी आई-वडील आनंदानं करतात. सध्या व्हायरल होत असलेल्या चिमुकलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठीही तिच्या नवीन आई-वडिलांनी अशीच तयारी केल्याचे दिसत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दत्तक घेतलेल्या चिमुकलीचा नव्या घरातील पहिला वाढदिवस साजरा केला जात आहे. घर छान सजवण्यात आलं असून, तिच्यासाठी केकही आणलेला आहे. त्याशिवाय यावेळी तिच्या अनेक मित्र-मैत्रिणींनाही बोलावण्यात आलं होतं. हे सगळं पाहून चिमुकली खूप भावूक झाली असून, तिला रडताना पाहून तिची आई तिला जवळ घेते. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @digitalkesari या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर लाखो लाइक्सही मिळाल्या आहेत. युजर्सही या व्हिडीओवर अनेक कमेंट्स करत आहेत. एकानं लिहिलंय, “किती क्यूट बाळ आ.हे डोळ्यातून पाणी आलं”, तर दुसऱ्यानं लिहिलंय की, खरं म्हणालं तर जी अनाथ मुलं आहेत ती खूप शांत आणि किती नाही म्हटलं तरी अनाथ आहोत ही भावना कायम त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येते”, तर तिसऱ्यानं लिहिलंय, “आजकालच्या पोरांना नाजूक वयातच किती समज असते नाही का?”