Woman fell in manhole: बिहारची राजधानी पाटण्यात (Patna) एक महिला रस्त्यावरील मॅनहोलमध्ये पडली. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. वास्तविक, ही महिला फोनवर बोलत ऑटोच्या मागून जात असताना ही घटना घडली. रस्त्याच्या मधोमध असलेल्या मॅनहोलचे झाकण उघडे होते. तिथून ऑटो जाताच ती महिला त्या मॅनहोलमध्ये पडली. महिला पडताच घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी तिला वाचवण्यासाठी तातडीने पुढे सरसावले. काही सेकंदातच महिलेला बाहेर काढण्यात आले.

शहरातील व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

या अपघातात महिलेचा जीव वाचला, मात्र या घटनेच्या व्हिडीओने शहरातील व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. आता या प्रकरणाबाबत बिहारमधील प्रमुख विरोधी पक्ष आरजेडीने शहरातील उघडे पडलेले मॅनहोल आणि स्थानिक प्रशासनाच्या कामावरून सरकारवर निशाणा साधला आहे.

(हे ही वाचा: डेव्हॉन कॉनवेच्या प्री-वेडिंग पार्टीमध्ये पारंपारिक कपडे घालून थिरकली CSK ची टीम; व्हिडीओ होतोय viral)

अपघात कसा झाला?

ही घटना पटना शहरातील वॉर्ड क्रमांक ५६ ची आहे. ही महिला बाजारातून परतत असताना रस्त्याच्या मधोमध असलेल्या उघड्या मॅनहोलमध्ये पडली. एका हातात सामान घेऊन एक महिला शहराच्या दिशेने जात असताना दुसऱ्या हातात फोनवर बोलत असताना ही घटना घडली. यादरम्यान ओव्हरब्रिजजवळ मधल्या रस्त्यावर एक मॅनहोल उघडा होता. महिला मॅनहोलसमोर इकडे तिकडे पाहू लागली आणि अचानक चेंबरमध्ये पडली. मॅनहोलमध्ये पडलेल्या महिलेला वाचवण्यासाठी घटनास्थळी उपस्थित लोकांनी धाव घेतली. दुसरीकडे, सुखरूप बाहेर पडूनही पीडिता बराच वेळ सावली बसून राहिली होती.

(हे ही वाचा: Video: कधी जमिनीवर पडून तर, कधी उड्या मारत शुटिंग; असा कॅमेरामन तुम्ही बघितलाच नसेल)

(हे ही वाचा: Viral Video: फिटनेसवालं लग्न! वधू-वरांनी स्टेजवरच पुश-अप्स करायला केली सुरुवात)

स्थानिक लोकांमध्ये नाराजी

या प्रकाराबाबत स्थानिक नागरिकांमध्ये पालिका प्रशासनावर तीव्र नाराजी आहे. प्रत्यक्षात पाटण्यात कुठे मॅनहोल उघडे आहेत तर कुठे रस्ते तुटलेले आहेत. एनएमसीएच (NMCH) ते मालिया महादेव जल्ला रोडपर्यंत नमामि गंगे (Namami Gange) प्रकल्पाचे काम सुरू असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. याशिवाय इतर कामांमुळे ठिकठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत. शहरातील केसरीनगर, नाला रोड, राजीवनगर, आशियाना, राजा बाजार यासह अनेक भागात उघड्या मॅनहोल्समुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.