Lepord Viral Video: सोशल मीडियावर नेहमीच प्राण्यांचे विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यात अनेकदा प्राण्यांचे मजेशीर तर कधी थरारक व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. हे व्हिडीओ क्षणात लाखो व्ह्यूज मिळवतात. पण, या हिंस्र प्राण्यांचे व्हिडीओ जंगलातील असतात, ज्यात ते इतर प्राण्यांची शिकार करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, पण यात एका बिबट्याने मानवी वस्तीत शिरकाव केल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

माणसांप्रमाणेच प्राणीदेखील आपली भूक भागविण्यासाठी काही ना काहीतरी करत असतात. अनेकदा जंगलातील वाघ, सिंह, बिबट्या यांसारखे प्राणीदेखील भूक मिटविण्यासाठी एखाद्या प्राण्याची शिकार करतात, तर अनेकदा ते जंगल सोडून मानवी वस्तीतही शिरकाव करतात. खेड्यात असे प्रकार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्येदेखील असंच काही पाहायला मिळत आहे. हा धडकी भरवणारा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रात्रीच्या वेळी एक बिबट्या अचानक एका मानवी वस्तीमध्ये शिरकाव करतो. यावेळी शिकारीच्या शोधात बिबट्या एका घराबाहेर जाऊन उभा राहतो. इतक्यात त्याच घरातून एक तरूणी बाहेर येताना दिसतेय. परंतु बिबट्याला पाहून ती पटकन घरात जाऊन दरवाजा लावून घेते. सध्या बिबट्याचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @kiranwajageofficial या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून त्यावर आतापर्यंत एक मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि यावर हजारो लाइक्सही मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ:

एका युजरनं लिहिलंय, “बर झालं घरात नाही गेला” दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “रखवालदार आहे तो”, तर तिसऱ्या युजरनं लिहिलंय, “खूपच थरारक घटना” आणखी एका युजर्सने लिहिलंय की, “बिबट्या खूप भयानक प्राणी आहे.”