सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे कोणीही सांगू शकत नाही. कधी कधी अशा काही गोष्टी इथे व्हायरल होतात, ज्याचा तुम्ही विचारही करू शकत नाही. सध्या इंटरनेटवर खूप मजेदार व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ एका वर्गातील आहे. जिथे एक रिपोर्टर मुलांना प्रश्न विचारत आहे. यादरम्यान तो एका मुलाला अनेक प्रश्न विचारताना दिसतो. दरम्यान, एका प्रश्नावर या मुलाचे उत्तर ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडीओ एवढा मजेशीर आहे की तो पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरणार नाही. हा व्हिडीओ एका स्थानिक वृत्तनिवेदकाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. त्यानंतर त्याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की रिपोर्टर वर्गात जातो आणि विद्यार्थ्यांना काही सोपे प्रश्न विचारतो. यावर प्रतिक्रिया देताना विद्यार्थी असे काही सांगेल, याचा विचारही रिपोर्टने केला नसेल.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की रिपोर्टर एका विद्यार्थ्याला प्रश्न विचारतो, त्याचे वडील काय करतात? विद्यार्थी उत्तर देतो. यानंतर रिपोर्टर दुसरा प्रश्न विचारतो की वर्गात जेवण मिळते का? याला उत्तर देताना विद्यार्थ्याने होय, मिळते, असे सांगितले. यानंतर रिपोर्टरने विचारलेल्या प्रश्नावर विद्यार्थ्याने दिलेले उत्तर ऐकून तुमचे हसू थांबणार नाही. रिपोर्टरने विचारले तुम्हाला टॉयलेटचा अर्थ माहित आहे का? याला उत्तर देताना विद्यार्थी म्हणतो – वर्ग.

२५ वर्षाच्या मुलीने ६० वर्षाच्या वृद्धासोबत केलं लग्न; लग्नानंतर तरूणीचे दिलेली रिअ‍ॅक्शन व्हायरल

हे उत्तर ऐकून रिपोर्टर थक्क होतो आणि पुन्हा तोच प्रश्न विचारतो. ज्याला विद्यार्थी ‘वर्ग नाही शाळा’ असे उत्तर देतो. हा मजेदार व्हिडीओ bhutni_ke_memes नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video reporter asks student the meaning of toilet you cant help but laugh when you hear the boy answer pvp
First published on: 30-05-2022 at 18:18 IST