scorecardresearch

मगरीसोबत करत होता रोमँटिक डान्स; पुढे जे झालं ते पाहून तुम्हीही व्हाल थक्क

इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती पाण्यात उतरून एका मगरीसोबत डान्स करताना दिसत आहे.

तुम्ही कधी मगरीला एखाद्या व्यक्ती सोबत डान्स करताना पाहिलं आहे का? (Photo : Instagram/@outofcontextanimals)

सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ आहेत जे बघून आपण हैराण होतो. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. असा व्हिडीओ तुम्ही आधी कधीही पाहिला नसेल. आपण आतापर्यंत अनेक जोडप्यांना लग्न, पार्टी किंवा इतर खास प्रसंगी रोमँटिक डान्स करताना पाहिलं असेल. पण तुम्ही कधी मगरीला एखाद्या व्यक्ती सोबत डान्स करताना पाहिलं आहे का? नक्कीच पाहिलं नसेल.

हा व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती पाण्यात उतरून एका मगरीसोबत डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की हा व्यक्ती कमरेपर्यंत पाण्यात बुडून तलावाच्या मध्यभागी मगरीसोबत नाचत आहे. तो मगरीच्या अगदी जवळ उभा राहून नाचत आहे. तसेच, तो अजिबात घाबरलेला दिसत नाही आहे. मगर देखील त्या व्यक्तीशी अतिशय आरामात वागते आणि त्याला दुखापत करत नाही.

या Viral Photo मध्ये लपलेली मुलगी शोधणे इतके सोपे नाही; तुम्हीही करून पाहा प्रयत्न

हा व्हिडीओ outofcontextanimals या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘फक्त फ्लोरिडामध्ये तुम्ही मगरीसोबत नाचताना माणूस पाहू शकता.’ आतापर्यंत हा व्हिडीओ ६८ लाखांहून अधिक लोकांनी लाइक केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video romantic dance with crocodile you too will be amazed at what happened next pvp

ताज्या बातम्या