शाळेतले दिवस आठवले की आपोआप चेहऱ्यावर हसू येतं. तेव्हा केलेली मस्ती, काढलेल्या खोड्या, शिक्षकांचा मार, तेव्हाच्या गमतीजमती आठवून एक वेगळाच आनंद मिळतो. पूर्वीच्या काळी शिक्षक अभ्यासाबाबत खूप कडक असायचे. जर मुलाने गृहपाठ केला नाही किंवा वर्गात नियम मोडले तर शिक्षक त्याला मारहाण करण्यास मागेपुढे पहात नसत. पण, आजचे शिक्षक खूप बदलले आहेत. आजकाल शिक्षकांना मुलांशी सलोखा कसा निर्माण करायचा आणि त्यांना अभ्यास करायला आवडत नसताना त्यांच्यासोबत मजा कशी करायची हे माहीत आहे. शिक्षकांसोबतच्या अशा बंधांमुळे मुलेही त्यांच्यासमोर मोकळे होतात आणि त्यांच्यासोबत मजा करतात.

डान्सचा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला शिक्षिका वर्गात ‘कजरा रे’ या बॉलीवूड गाण्यावर नाचताना दिसत आहे. व्हिडीओच्या शेवटी एक विद्यार्थिनीही शिक्षकेसोबत डान्स करताना दिसत आहे. जर तुम्ही व्हिडीओ काळजीपूर्वक पाहिला तर तुम्हाला दिसेल की, ‘हॅप्पी बर्थ डे रश्मी मॅम’ मागे बोर्डवर लिहिलेले आहे. व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या शिक्षिकेचा वाढदिवस असण्याची शक्यता आहे आणि मुलांनी शुभेच्छा दिल्यानंतर तिने वर्गात डान्स केला, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे पाहून कदाचित तुम्हालादेखील आपल्या शाळेतले दिवस आठवतील. 

an old lady dance on 90s famous song
90’s च्या गाण्यावर आजीने केला भन्नाट डान्स, VIDEO होतोय व्हायरल
When Indian young woman wears saree and takes over streets of Japan
Video : जेव्हा भारतीय तरुणी जपानच्या रस्त्यावर साडी नेसून फिरते, तेव्हा.. पाहा व्हायरल व्हिडीओ
CSK fans teach dance steps to cheer girls
VIDEO : CSK च्या चाहत्यांनी भर स्टेडियममध्ये शिकवला चीअर गर्ल्सना डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
Rohit Sharma Tilak Varma Mumbai Indians Video
‘काय हिरो, गार्डनमध्ये आला आहे का?’ तिलक वर्माचं उत्तर ऐकून रोहित शर्माच झाला चकित, VIDEO व्हायरल
career
शिक्षणाची संधी: आयआयटी, मद्रासमधील ऑनलाइन कोर्सेस
A hilarious answer written by a 5th student
विद्यार्थी जोमात, शिक्षक कोमात! पाचवीतल्या विद्यार्थ्याने लिहिलं हटके उत्तर; उत्तरपत्रिका वाचून येईल हसू
Kareena Kapoor Khans wax figure a woman first reaction goes viral on social media
VIDEO : करीना कपूरला पाहताच महिलेनी केले असे कृत्य…; व्हिडीओ होतोय व्हायरल
cat and rats true friendship
टॉम अँड जेरी! कधी प्रेम तर कधी राग; मांजर उंदराची अनोखी मैत्री, पाहा व्हायरल VIDEO

(हे ही वाचा: मगरीचा व्यक्तीवर जबर हल्ला; हात जबड्यात पकडून खेचलं अन् नंतर जे घडलं…)

व्हायरल व्हिडीओ येथे पाहा

हा व्हिडीओ मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर @yeazlas नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना अकाउंट युजरने लिहिले की, “कधीही विचार केला नव्हता की, असा दिवस आपण पाहणार आहोत; जेव्हा शिक्षक वर्गात आयटम साँगवर डान्स करतील.” वृत्त लिहिपर्यंत हा व्हिडीओ सहा लाख २१ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. पण, हा व्हिडीओ पाहून नेटकरी मात्र थक्क झाले आहेत. त्यांच्या डान्स स्टेप्सवर गमतीशीर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आपली वर्गशिक्षिका आठवत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला काय वाटलं? तुम्हीदेखील आपल्या प्रतिक्रिया द्या.