Michael Jacksons Facial Evolution : पॉप स्टार या शीर्षकाला सर्वाधिक प्रसिद्धी ही मायकल जॅक्सनने मिळवून दिली. ‘किंग ऑफ पॉप’ या नावाने जागतिक किर्ती प्राप्त करणा-या या पॉप स्टारला जगाचा निरोप घेऊन १३ वर्षे उलटून गेली आहेत. २५ जून २००९ रोजी मायकल आपल्या घरात मृतावस्थेत आढळला होता. सिंगिंग आणि डान्सव्यतिरिक्त ज्यासाठी मायकल नेहमी लक्षात राहिल, ती गोष्ट म्हणजे त्याचा बदलत गेलेला चेहरा. परंतु, वेगळं आणि सुंदर दिसण्यासाठी मायकल आपल्या चेहऱ्यासाठी पाण्यासारख्या पैसा खर्च करायचा हे अनेक चाहत्यांना ठाऊक असेल. मायकलने सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्यावर अनेकदा शस्त्रक्रियादेखील करून घेतल्या होत्या. त्याने आपल्या चेहऱ्यावर केलेली प्लास्टिक सर्जरी त्याकाळी चर्चेत आली होती. यावरून मायकल टीकेचा धनीही झाला. मायकलने शस्त्रक्रियेने त्याच्या त्वचेचा रंग बदलला. सोबतच चेहऱ्यावरील इतर अवयव जसे नाक, ओठ, डोळे यांवरही शस्त्रक्रिया करून घेतल्या. सध्या सोशल मीडियावर मायकल जॅक्सनच्या चेहऱ्यावरील बदलांचा एक व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरू लागलाय. हा व्हिडीओ पाहून नेटकरी मात्र भावूक झाले आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये मायकल जॅक्सनच्या वयाच्या ११ व्या वर्षापासून ते ५० वर्षापर्यंत त्याच्या चेहऱ्यात झालेले बदल दाखवण्यात आले आहेत. सिंगिंग आणि डान्सव्यतिरिक्त ज्यासाठी मायकल त्याचा बदलत गेलेला चेहऱ्यासाठी कायम लक्षात राहिला आहे. १९८७ मध्ये त्याने प्लास्टिक सर्जरी करुन घेतल्यानंतर त्याचा नवीन लूक बघण्याच्या उत्सुकतेपोटी त्याच्या अल्बमच्या तीन कोटी प्रति विकल्या गेल्या होत्या. अनेकदा चेहऱ्यात बदल करुन सुद्धा मायकलने प्लास्टिक सर्जरी केल्याचे कधीही मान्य केले नाही. या व्हायरल व्हिडीओमध्ये सन १९६९ पासून ते २००९ पर्यंत मायकल जॅक्सनच्या चेहऱ्यात हळुहळु कसे बदल होत गेले हे दाखवण्यात आले आहे. मात्र, हा व्हिडीओ अनेकांना आवडला नाही. व्हिडीओमध्ये मायकलच्या त्वचेचा टोन आणि चेहऱ्याचे फीचर्स देखील कालांतराने कशी बदलली हे दिसत आहे. त्याच्या गालाची हाडे तीक्ष्ण आणि त्वचेचा रंग हलका होत गेला आहे.

आणखी वाचा : “आयुष्य सोपं नाही…!”, ट्रॅफिकमध्ये भर पावसात भिजत होता स्विगी डिलिव्हरी बॉय, पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : सरकारी शाळेतल्या ‘मॅडम’चा राजेशाही थाट! शिकवण्याऐवजी विद्यार्थ्यांकडूनच करून घेतला मसाज

हा व्हिडीओ २६ जून रोजी लॉस्ट इन हिस्ट्री नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ आता तेजीने सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. या व्हिडीओला ५.५ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहून लक्षात येतं की त्याच्या चेहऱ्याचे अनेक भाग ठीक करण्यासाठी त्याने अनेक शस्त्रक्रिया केल्या आहेत. पण शस्त्रक्रिया त्याच्या वैद्यकीय उपचारांचा एक भाग आहे आणि जॅक्सनने जाणूनबुजून त्याच्या चेहऱ्यामध्ये बदल करण्यासाठी काहीही केलं नाही, असं काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

आणखी वाचा : जीवाची पर्वा न करता दलदलीत उतरून काळवीटाच्या पिल्लाचा जीव वाचवला! पाहा VIRAL VIDEO

नेटकऱ्यांच्या काही प्रतिक्रिया:

आणखी वाचा : कोणतंही सुरक्षा साधन न वापरता डोंगर चढतात हे भिक्खू, हा VIRAL VIDEO पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

एका युजरने म्हटले की, “त्याला विटिलिगो नावाचा त्वचारोग झाला होता, त्याच्या त्वचेवर बरेच पांढरे डाग होते, पांढऱ्या डागांपेक्षा काळे डाग कव्हर करणे सोपे होते, त्याची इच्छा होती म्हणून त्याने कधीही त्याच्या त्वचेचा रंग बदलला नाही.” डान्स प्रॅक्टिसदरम्यान त्याचं नाकही तुटलं, त्यानंतर त्याला दुसरी शस्त्रक्रिया करावी लागली. मात्र मायकल जॅक्सनच्या या व्हिडीओमुळे त्याच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत.