सतत प्रयत्न करुनही अनेकदा यश पदरी पडत नाही आणि तिथेच आपल्या संयमाचा बांध फुटतो. जीवाचा आटापिटा करुनही एखादी गोष्ट मिळत नाही, त्यावेळी होणाऱ्या वेदना नेमक्या काय असतात याची नव्यानं ओळख करुन देण्याची गरज नाही. पण आपल्याला आयुष्यात एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून त्याचं दुःख घेऊन बसतो. पण जगात असे बरचे लोक असतात ज्यांना दोन वेळच्या जेवणाची पंचायत असते. मग अशा लोकांनी किती रडत बसावं? हे सगळं सांगण्याचं कारण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका चिमुकल्याचा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकला रस्त्यावर पाव भाजी विकून आपलं पोट भरवत आहे. याचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा भावूक व्हाल.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ज्या हातात बॅट घेऊन मैदानात मित्रांसोबत बालपण अनुभवण्याचे दिवस आहेत, त्या दिवसात एक चिमुकला हातगाडीवर पाव भावी विकून आपल्या पोटापाण्याची सोय करताना दिसतोय. आयुष्यात एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा किंवा कुणापुढे हात परवण्यापेक्षा या चिकल्याने स्वतः पावभाजी विकण्याचं काम करण्याचा निर्णय घेतला हे पाहून त्याचं कौतूक वाटतं. मोठ्या धैर्याने तो ही पावभाजीची हातगाडी चालवतो. हा चिमुकला पाव भाजी गरम करत असल्याचं दिसत आहे आणि ते करताना त्याच्या चेहऱ्यावरील एका छोटीश्या स्माईलने नेटिझन्सची मने जिंकले आहे. इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही या मुलाच्या चेहऱ्यावर कोणत्याही दुःखाची सावली मात्र दिसून आली नाही.

आणखी वाचा : यापैकी एक अंड थोडं वेगळं आहे! यामागचं कारण जाणून घेण्यासाठी पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : फणा काढून उभा असलेल्या किंग कोब्राच्या माथ्यावर केलं कीस; VIRAL VIDEO पाहून अंगावर काटा येईल

हा व्हिडीओ लोकांना जगण्यासाठीचा नवा दृष्टीकोण देत आहे. आयुष्यात कितीही दुःख संकटे आली तरी खचून न जाता प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे, असा धडा या व्हिडीओमधून मिळतो. हा व्हिडीओ hp._.saini नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ लोकांना फार आवडू लागलाय. लोक हा व्हिडीओ वारंवार पाहू लागले आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत १ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर चार हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देत मुलाच्या मेहनतीचं कौतूक केलंय.