Viral Video: आजकालच्या लहानमुलांमध्ये सोशल मीडियाप्रति खूप उत्सुकता आणि आकर्षण आहे. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलंदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली कला सादर करू लागली आहे. आतापर्यंत आपण अनेक व्हायरल व्हिडीओ पाहिले आहेत. दरम्यान, आता अशाच एका गोड चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो खूप चर्चेत आला आहे.
सोशल मीडियावर कधी कुठलं गाणं मोठ्या प्रमाणात चर्चेत येईल, हे सांगता येत नाही. या चर्चेत असलेल्या नव्या किंवा जुन्या गाण्यांवर प्रत्येक वयोगटातील लोक, मोठमोठे कलाकारही ठेका धरताना दिसतात. आता एका चिमुकलीचा डान्स व्हायरल होतोय. हा पाहून नेटकरीही तिचं कौतुक करत आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक लहान मुलगी तिच्या घरामध्ये “निंबुडा निंबुडा निंबुडा”, या जुन्या हिंदी गाण्यावर डान्स करत आहे. तिच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभावही कमालीचे आहेत. शिवाय यावेळी ती नाचत असताना तिच्या घरातील श्वान तिला त्रास देताना दिसतोय. पण तरीही ती विचलित न होता डान्स करत राहते.
पाहा व्हिडीओ:
या व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @swarnika_thakur2222 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत जवळपास लाखो व्ह्यूज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “मस्तच नाचली.” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “किती गोड आहे ही”