Viral Video: हल्लीची ही मुलं सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार वागताना, बोलताना दिसतात. सोशल मीडियाप्रति मुलांमध्ये खूप उत्सुकता आणि आकर्षण आहे. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलंदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली कला सादर करताना दिसतात. आतापर्यंत आपण अनेक व्हायरल व्हिडीओ पाहिले आहेत. दरम्यान, आता अशाच एका गोड चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो खूप चर्चेत आला आहे.
हल्ली सोशल मीडियावर कोळी गीतदेखील खूप चर्चेत येऊ लागली आहेत. सध्या अशाच एका कोळीगातावरील एक डान्स खूप व्हायरल होतोय. यामध्ये दोन तरूणी सुंदर डान्स करताना दिसत आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकली “पुरा कोळीवाडा आज झिंगला”, या गाण्यावर डान्स करताना दिसतेय. चिमुकलीचा डान्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही तिचं कौतुक कराल.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @adira_chavan या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत लाखो व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय “खूप सुंदर डान्स” आणखी एकाने लिहिलेय, “मस्त” आणखी एकाने लिहिलेय, “एक नंबर केलं दोघींनी”