बस आणि लोकल ट्रेनमध्ये सीट मिळवण्यासाठी लोक किती धडपड करतात हे तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. अशी दृश्ये गावाबरोबरच शहरांमध्येही पाहायला मिळतात. गावाकडे काही लोक बसमध्ये बसण्यासाठी अनेक तास आधीच रांगा लावतात, तर काही लोक बसमध्ये रुमाल टाकून आपली जागा आधीच मिळवतात. सीट मिळवण्यासाठीच्या गमतीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.हा व्हिडीओ पाहून तुम्ही पोट धरून हसाल.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती आधीच बसमध्ये जाऊन आपली सीट पकडतो. पण त्याच्या पत्नीला जागा मिळू शकली नाही. मग काय, त्याने बसच्या मागची खिडकी उघडून रस्त्यावर उभ्या असलेल्या पत्नीला खिडकीतून बसच्या आत ओढून घेतो. अशा प्रकारे दोघांनाही बसमध्ये जागा मिळते. दुसरीकडे बसमध्ये येण्यासाठी अजूनही रांगा लागल्या होत्या. हा व्हिडीओ पाहून काही लोक हसत आहेत तर काही लोक त्यावर चिंताही व्यक्त करत आहेत.

आणखी वाचा : ‘स्पायडर मॅन’सारखा हा माणूस तीन मजली इमारती सरसर चढतो, VIRAL VIDEO पाहून तुम्हीही थक्क व्हाल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : गुलाबी थंडीत ब्लँकेटच्या आत मुलगी जे करत होती ते पाहून आई हैराण झाली, पाहा हा VIRAL VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीने आपल्या पत्नीला बसमध्ये जागा मिळवण्यासाठी ज्या पद्धतीने जुगाड केलाय तो पाहून लोक पोट धरून हसू लागले आहेत. हा व्हिडीओ पाहणं खूपच मजेदार आहे. पण हा जुगाड करणं कधी कधी अतिशय धोकादायकही ठरू शकतं. हा व्हिडीओ memecentral.teb नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. एक व्यक्ती लिहिते, ‘तो खूप मजबूत आहे. कारण तिच्या वयाची महिला अशा पद्धतीने उचलणं फारच कठिण आहे. दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘काकांचा कॉन्फिडन्स लेव्हल फारच जबरदस्त होता.’