अनेकदा उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूण्यांना आमंत्रित केलेलं तुम्ही पाहिलं असेल. पण कासव उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूण बनून आलेला, असं जर आम्ही तुम्हाला सांगितलं तर? यावर तुमचा विश्वास बसणार नाही कदाचित. पण हे खरंय. उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी कासव प्रमुख पाहूणे बनून आला आणि त्याने रिबीन सुद्धा कापली. हे सारं ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. 


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ तसा जुनाच आहे, पण तो सध्या नव्याने व्हायरल होतोय. हा व्हिडीओ मूळत: २०१५ मध्ये प्रकाशित झालेल्या BBC च्या अहवालाचा एक भाग होता. हा व्हिडीओ नुकताच ‘Buitengebieden’ ट्विटर पेजवर शेअर करण्यात आली आहे. या पेजवरून नियमितपणे मजेदार आणि मोहक व्हायरल व्हिडीओ शेअर केले जातात. हा व्हिडीओ आता इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला ९.२ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज आणि ४ लाख ४८ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : सरकारी शाळेतल्या शिक्षिकेचा ‘झुमका बरेली वाला’वर डान्स, बड्या बड्या हिरोईन्सही पडतील फिक्या


यूकेमधील लिंकन विद्यापीठातील विज्ञान प्रयोगशाळेच्या उद्घाटन समारंभा दरम्यानचा हा व्हिडीओ आहे. या प्रयोगशाळेच्या उद्घाटनासाठी चक्क एका कासवाला प्रमुख पाहूणे बोलवण्यात आलं होता. ‘चार्ल्स डार्विन’ नावाचे हे कासव आपल्या दातांनी रिबीन कापून प्रयोगशाळेचं उद्घाटन करताना दिसून येत आहे. टीव्ही प्रेझेंटर आणि निसर्गवादी ख्रिस पॅकहॅम हे देखील या उद्घाटन प्रसंगी आले होते. याच विद्यापीठात ते प्राध्यापक म्हणून नियुक्त झाले आहेत. त्यांनी या कासवाला पकडून हे उद्घाटन केलं. कासवाने कापलेली रिबीन पाहून तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनी टाळ्या वाजवत त्याचं स्वागत केलं. 

आणखी वाचा : त्सुनामी सारखे ढग तुम्ही कधी पाहिलेत का? मग हा VIRAL VIDEO एकदा पाहाच

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : दोन सूनांमध्ये जबदरस्त फाईट, भांडताना नाल्यातच पडल्या आणि तिथेही…; करोडपती कुटुंबातील भांडणाचा VIDEO VIRAL


जोसेफ बँक्सच्या नवीन प्रयोगशाळांच्या उद्घाटनाच्या वेळी चार्ल्स डार्विन या कासवाने रॉकेट आणि डँडेलियनच्या पानांनी बनवलेली ही रिबीन कासवाने कापली. ट्विटरवर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. त्यानंतर हे कासव आहे की नाही यावर चर्चा रंगायला सुरूवात झाली. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्घाटन समारंभातील त्याच्या सहभागाबद्दल बोलताना ख्रिस पॅकहॅम म्हणाला की, “मी चार्ल्स डार्विनसोबत स्टेज परफॉर्मन्स करण्याची अपेक्षाच कधी केली नव्हती. हे विद्यापीठाच्या महत्त्वाकांक्षेचे प्रतीक आहे. हे साधे उद्घाटन नव्हते.असे उद्घाटन कुणीच करू शकत नाही,”, असं देखील तो म्हणाला.