Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. त्यात मजेशीर, तसेच डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. डान्स करणे हा अनेकांसाठी एक उत्तम विरंगुळा असतो. डान्स केल्यावर शरीराचा व्यायाम तर होतोच; पण मनही शांत होते. मुलीही अनेकदा एकत्र आल्या की, एखाद्या गाण्यावर डान्स सादर करून दाखवतात. डान्सची असणारी आवड त्यांना शांत बसू देत नाही. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही तुम्हाला असंच काहीतरी पाहायला मिळेल.

सोशल मीडियावर कधी डान्स, तर कधी गाणी, कधी अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. त्यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की, ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दरम्यान, आता दोन तरुणींचा डान्स खूप व्हायरल होत आहे, ज्यातील त्यांच्या डान्सचं नेटकरी भरभरून कौतुक करताना दिसत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन तरूणी ‘झल्ला वल्लाह’ या हिंदी गाण्यावर सुंदर डान्स करत आहेत. यावेळी त्या करत असलेल्या डान्स स्टेप्स अन् चेहऱ्यावरील हावभाव तुम्हीही त्यांचे कौतुक कराल. त्यांचा हा डान्स सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @vaishnavi__vaibhavi या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, त्यावर आतापर्यंत लाखों व्ह्युज मिळाल्या असून, त्यावर लाखो लाइक्सही मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरनं लिहिलंय, “व्वा दोघीही खूपच सुरेख नाचलात”, तर दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “अति सुंदर,अप्रतिम”, तर आणखी एकानं लिहिलंय, “एकच नंबर डान्स केला तुम्ही तर”.