सोशल मीडियावर पक्षी-प्राणी आणि जनावरांचे (वाइल्डलाइफ) एकपेक्षा एक सरस आणि मजेदार व्हिडिओ व्हायरल होतात. प्रत्येकाला प्राण्यांच्या लढाईचे व्हिडिओ पाहायला आवडतात. नेटकरी आशा व्हिडिओला जास्त पसंती दर्शवतात. असाच एक बिबट्या आणि बेडकाच्या युद्धाचा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला आहे.

असे म्हटले जाते की बिबट्याचा हल्ल्यापासून वाचण्याचा प्रयत्न प्रत्येक प्राणी आणि जनावर करतो. पण व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमुळे सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. जंगलात बिबट्या आणि बेडकामध्ये लढाई (Leopard Vs Frog) झाली. तुम्हाला वाटेल की बिबट्याने बेडकाची शिकार केली असेल. पण तसे काही झाले नाही. बेडकाने हिंमत्तीने बिबट्यासोबत दोन हात करत आपला जीव वाचवण्यात यश मिळवलं.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. इंडियन फॉरेस्ट सर्विसचे आधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. ट्विट करताना सुशांत नंदा लिहतात की, ‘वेळ बदलत आहे. बेडूक आणि बिबट्यामधील अविश्वसनीय लढाई. पाहूयात कोण जिंकेल?’

१८ सेंकदाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जंगलातील एका झाडाखली बेडूक बसला आहे. त्यावेळी बिबट्या तिथं येतो आणि पाय मारायला सुरूवात करतो. त्यावेळी बेडूक आपलं तोंडातून फुसकारत प्रतिकार करतो तरीही बिबट्या मागे हटायला तयार होईना. अखेर उडी मारून हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी बिबट्या तेथून निघून जातो.