सणासुदीच्या काळात आपल्या कुटुंबातील लोकांसोबत राहून सण साजरा करावा ही प्रत्येकाची मनापासून इच्छा असते. विशेषत: होळी दिवाळीबद्दल बोलायचे झाले तर हे असे सण आहे ज्यामध्ये प्रत्येकजण स्वतःच सजून धजून राहत नाही तर आपलं घर देखील सजवतो. यामुळेच या सणांमध्ये संधी मिळताच लोक घराबाहेर पडतात. यावेळी हा सण लाँग वीकेंडला येतो ही भाग्याची गोष्ट आहे. अशा परिस्थितीत शुक्रवारीच आपली कामे उरकून लोक आपआपल्या नातेवाईकांच्या घरी निघून गेले. पण हे दृश्य फक्त माणसांमध्येच आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. प्राण्यांनाही घरी जाण्याची घाई असते. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.

या व्हिडीओमध्ये एक मोठा हत्ती पर्यटकांच्या बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहे. या व्हिडीओमधल्या हत्तीने अगदी माणसाप्रमाणेच आपली सोंड दाखवत बस थांबवण्याचा प्रयत्न केलाय. हे पाहून बसचा वेगही कमी होतो. हत्ती आपल्या सोंडेने बसवर वारंवार हल्ला करतो, त्याने बसला हादरवण्याचाही प्रयत्न केला. व्हिडीओमध्ये हत्ती चढण्याचा प्रयत्न करत असताना संथ गतीने चालणारी बस पूर्णपणे थांबताना दिसत आहे. जणू काही हत्तीलाही बसमध्ये बसून कुठेतरी जायचे आहे. परंतु हा हत्ती आणखी काही गोंधळ घालण्यापूर्वीच बसचालक तिथून आपली बस पुढे पुढे हलवतो. हे पाहून हत्तीही बस सोडून देतो.

A case has been registered against the girlfriend who killed her boyfriend Nagpur crime news
प्रियकराचा खून करणाऱ्या प्रेयसीवर गुन्हा दाखल; हुडकेश्वर पोलिसांचा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न?
With 200 runs per day in IPL is it time to rethink the pitch impact player rule
‘आयपीएल’मध्ये दररोज २०० धावांच्या राशी! खेळपट्ट्या, इम्पॅक्ट प्लेयर नियमाचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे का?
Tata Punch Car sale
टाटाच्या ‘या’ सर्वात स्वस्त SUV नं Wagon R, Dzire चं वर्चस्व संपवलं? झाली दणक्यात विक्री, मायलेज २६ किमी
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १ लाख ३५ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर साडे तीन हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. मात्र हा व्हिडीओ कुठला आहे हे अद्याप समजू शकलेले नाही.

आणखी वाचा : दोरीला लटकलेल्या गोणीशी खेळताना पांडा धापकन पडला, VIRAL VIDEO पाहून खळखळून हसाल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : या मुलाने घराची भिंत नव्हे, वही किंवा कागद नव्हे तर पांढरी शुभ्र कार रंगवली!

हा व्हिडीओ सुरुवातीला भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी दीपांशु काबरा यांनी शेअर केला होता. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिले की, “दिवाळीच्या सुट्टीत प्रत्येकाला लवकरात लवकर घरी पोहोचायचे आहे”. काबरा यांच्या पोस्टला १ लाख ३५ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज आणि हजारो लाईक्स मिळाले आहेत.