Railway accident video viral : रेल्वे अपघाताच्या रोज अनेक बातम्या आपण ऐकत असतो. त्यापैकी बरेच अपघात हे त्यांच्या स्वत:च्याच चुकीमुळे झालेले असतात. कधी धावत्या लोकलमध्ये चढताना पाय घसरतो, कधी दरवाजात उभे असताना तोल जातो. लोकांना कितीही सांगितलं तरी ते ऐकत नाहीत. ‘अती घाई संकटात नेई’, असं म्हटलं जातं आणि ते खरंच आहे. अनेक प्रवासी रेल्वे प्लॅटफॉर्मवर असल्यावर ट्रेन पकडण्यासाठी धोकादायक प्रवास करण्याचा प्रयत्न करतात. वारंवार आवाहन केलं जात असलं तरी काही महानग असे असतात जे यातून कोणताही धडा घेत नाहीत आणि आपला जीव धोक्यात घालतात. कधी कधी ते मोठ्या अपघाताला बळी पडतात आणि मृत्यूही पत्करतात. सध्या अशीच एक रेल्वे स्थानकावरील घटना समोर आलीय. यामध्ये धावती ट्रेन पकडण्याच्या नादात माय-लेक ट्रेनखाली गेली आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रेल्वे प्लॅटफॉर्मवरुन वेगात सुरु झालेली असताना, एक महिला आणि तिचा मुलगा धावती लोकल पकडण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी महिलेनं तिच्या मुलाला उचलंल आणि लोकलमध्ये उचलून चढवण्याचा प्रयत्न करत होती. मात्र त्याचवेळी तिचा तोल जातो आणि ती प्लॅटफॉर्मवर पडते. यामध्ये दिसत आहे, सुरुवातीला ती प्लॅटफॉर्मवर फरपटत जाते त्यानंतर ती प्लॅटफॉर्मवर पडते. सोबतच महिलेचा मुलगाही खाली पडतो. यानंतर लगेच तिथे उपस्थित असलेले आरपीएफ जवान महिलेच्या मदतीसाठी धावतात आणि महिलेचा अन् तिच्या लहान मुलाचा बचाव करतात. या अपघातात महिला थोडक्यात बचावली गेली असून तिच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत.

BJP Victory On 4th June Morning People Taunts By Sharing Attack Video
भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्येच झाली हाणामारी आणि दोष मात्र.. प्रचारयात्रेचा Video पाहून पडाल बुचकळ्यात, खरं काय?
man beats wife with baseball bat
पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत पाहून पतीचा पारा चढला; बेसबॉल बॅटनं केली मारहाण; गुन्हा दाखल
panvel dr sujay vikhe patil marathi news,
पारनेरचा प्रचार कामोठेमध्ये
man killed in dispute between two groups over trivial reason in thane
ठाणे : क्षुल्लक कारणावरून दोन गटातील वादातून एकाची हत्या

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> पोलीस झाल्यानंतरचा पहिला पगार आईच्या हातात; माय-लेकाचा VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

@RPF_INDIA नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर भरपूर लाईक्स आणि कमेंट येत आहेत. त्या आरपीएफ महिलेचं नेटकऱ्यांकडून कौतुक केलं जातंय. यापूर्वीही स्टेशवर अशा अनेक घटना घडल्या आहेत, तरीही लोक यातून धडा न घेता अशीच स्टंटबाजी करत जीव धोक्यात घालतात.