Viral Video: रस्ते अपघाताचे अनेक नवनवे व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत असतात. त्यातील काही अपघात वाहनचालकांच्या चुकीमुळे झालेले असतात; तर काही अपघात समोरच्या वाहनाच्या चुकीने घडलेले असतात. असाच एका भीषण अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर अक्षरश: काटा येईल.

बाईकचे अनेक अपघात महिलांच्या ओढणी, स्कार्फ किंवा साडीच्या पदरामुळे होतात. कारण बाईकवर बसताना गाडीच्या चाकात नकळत ओढणी किंवा साडीचा पदर अडकतो, ज्यामुळे खूप भयानक अपघात होतात. आजपर्यंत आपण अशाप्रकारचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. आताही असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक पुरुष बाईक चालवत असून महिला त्याच्या मागे बसलेली दिसतेय. परंतु, यावेळी नकळत तिच्या साडीचा पदर बाईकच्या चाकात अडकतो आणि ती खूप जोरात खाली पडते. तिच्याबरोबर बाईक चालवणाऱ्याचाही तोल जातो. यावेळी आसपासचे लोकही त्यांना उचलण्यासाठी जमतात. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

व्हिडीओ पाहण्यासाठी खालील फोटोवर क्लीक करा

https://www.instagram.com/reel/DLi-0adSKUj/?utm_source=ig_web_copy_link

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @m_meena_ji_sikar_sikar या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून आतापर्यंत याला हजारो व्ह्युज आले असून अनेक लाइक्सही मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिलंय की, “पहिल्यांदा बाईकवर बसून जिन्स घालण्याचा फायदा समजला”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “किती जोरात पडली बिचारी”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “खूपच भयानक प्रकार.”