Viral Video: सोशल मीडियाआधीचे जग आणि सोशल मीडियानंतरच्या जगात जमीन-अस्मानाचा फरक पाहायला मिळतो. आताची पिढी सोशल मीडियामध्ये मग्न झालेली पाहायला मिळते. सोशल मीडियावर लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाला आकर्षित करेल अशाप्रकारचे नवनवीन कटेंट असतात. कितीही नाही म्हटलं तरी अनेकजण आपल्या दिवसातील जास्तीत जास्त वेळ त्यावर घालवतात. परंतु सोशल मीडियामुळे अनेकांचे आयुष्यही बदलू लागले आहे. यामुळे अनेक कलाकारांच्या केलेला वाव मिळत आहे. शिवाय हे कलाकार त्यातून पैसेही कमावत आहेत.

सोशल मीडियावर नवनवीन गाणी, डान्सचे व्हिडीओ, तसेच विविध प्रकारच्या गोष्टी व्हायरल होत असतात. व्हायरल झालेल्या गाण्यांवर, डायलॉग्ज किंवा डान्स स्टेप्सवर लोक मोठ्या प्रमाणात रील्स बनवताना दिसतात. या चर्चेत असलेल्या गोष्टींवर अनेक सेलिब्रिटीदेखील रील्स बनवितात. सध्या सोशल मीडियावर ‘एक नंबर तुझी कंबर’, हे गाणं खूप चर्चेत आहे. आता या गाण्यावर एका चिमुकलीनं जबरदस्त डान्स केल्याचे पाहायला मिळत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरूणी पारंपारिक कोळी पद्धतीची साडी नेसून ‘एक नंबर तुझी कंबर’या गाण्यावर खूप सुंदर डान्स करताना दिसत आहे. यावेळी ती करत असलेल्या डान्समधील सर्व स्टेप हटके असून आकर्षित करत आहे. शिवाय डान्स स्टेपसह तिच्या चेहऱ्यावरील हावभावही लक्ष वेधून घेत आहेत. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @suvidha_sanjay_mone या अकाउन्टवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत एक मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत आणि यावर हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. शिवाय अनेक नेटकरीही यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.

यावर एका युजरने लिहिलंय की, “खूप छान नाचतेस ताई”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “व्वा काय नाचली ही एकच नंबर”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “आईशप्पथ ताईने राडा केलास”