Shocking video: लूटमारीच्या, चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. चोर चोरी करण्यासाठी नवनवीन आयडीया घेऊन येत असतात. कितीही चलाख चोर असुदेत पोलीस चोराला शोधून काढतातच. तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही. अशातच एका तरुणाने ३० सेकंदात बँकेतून रोख रक्कम भरलेली बॅग चोरली हातचलाखीने सर्वांची नजर चुकवत चोर बॅग घेून पसार झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चोरीची पद्धत पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील एका बँकेत मोठी चोरी झाल्याची घटना घडली आहे. एका चोरट्याने ग्राहकाची रोख रक्कम भरलेली बॅग कोणाच्या लक्षात न येता पळवून नेली.शनिवारी सोशल मीडियावर पसरलेल्या सीसीटीव्ही फुटेजमुळे ही बाब समोर आली. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये चोर ग्राहक असल्याचे भासवत बँकेत आल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये तु्म्ही पाहू शकता, निळा टी-शर्ट आणि काळी पँट घातलेला एक तरुण प्रथम मागून बेफिकीरपणे आत फिरताना दिसतो.त्यानंतर त्याला एका टेबलाखाली ठेवलेली बॅग दिसते ज्यामध्ये एका ग्राहकाचे पैसे असल्याचा आरोप आहे. ३० सेकंदात त्याने बॅग उचलली आणि बँकेतून पळून गेला.

सोशल मीडियावर दररोज चोरीचे धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असतात, जे पाहिल्यानंतर लोकांची चांगलीच तारांबळ उडते. सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे

पाहा व्हिडीओ

हे लक्षात येताच पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आणि त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पुरावा म्हणून सादर करण्यात आले आहे आणि आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हा व्हायरल झालेला सीसीटीव्ही व्हिडिओ लोक सोशल मीडियावर प्रचंड शेअर करत आहेत. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक यूजर्सनी आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. व्हायरल होत असलेल्या या पोस्टवर लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, “विश्वास ठेवणे कठीण आहे.” दुसऱ्या यूजरने लिहिले की, “बापरे सावध राहणं गरजेचं आहे”