धूर आणि धुक्यामुळे देशाची राजधानी दिल्ली सध्या ‘प्रदूषणाची राजधानी’ झाली आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून धुरक्यामुळे दिल्लीतली परिस्थिती आणखी वाईट झाली आहे. धुरक्यामुळे समोरच काही दिसेनासं झालं आहे. लोकांचं आयुष्य धोक्यात आलं आहे. शाळा महाविद्यालयात सुटी जाहीर करण्यात आली आहे. अशी चिंताजनक परिस्थिती सध्या दिल्लीत आहे. यावर सोशल मीडियावर चर्चा रंगल्या असताना वीरेंद्र सेहवागनंही या चर्चेत उडी घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेहमीप्रमाणे वेगळ्या शैलीत ट्विट करत वीरूने या प्रकरणाकडे तमाम भारतीय चाहत्यांचे लक्ष वेधले. ‘दिल्लीमध्ये इतना कोहरा है की….. ‘ असं ट्विट करत लोकांना या चिंताजनक स्थितीवर काय वाटतं, याबद्दल लिहिण्याचं आवाहन त्याने केले. सेहवागच्या या ‘गाळलेल्या जागा भरा’ आवाहनाला सोशल मीडियावर भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. त्यावर लोक व्यक्त होताना दिसून येत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virender sehwag tweet on delhi smog goes viral
First published on: 10-11-2017 at 14:08 IST