नियम पाळा अपघात टाळा अशी पाटी आपण अनेकदा घाटांमध्ये प्रवास करताना पाहतो. मात्र वेगाशी स्पर्धा करण्याची नसती हौस आणि वाहतूक नियमांकडे केलेला कानाडोळा या गोष्टींमुळे अनेकदा भीषण अपघात झाल्याचं पहायला मिळतं. अनेकदा हे भीषण अपघात इतरांसाठी धडा ठरतात. या अपघातांचे सीसीटीव्ही व्हिडीओ हे आपण कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत याबद्दलची कल्पना देतात. तरीही अशा अपघातांमधून लोक शिकत नसल्याचं दिसून येतं. असाच बेजबाबदापणे गाडी चालवल्याने झालेला अमेरिकेमधील एक भयानक अपघात कॅमेरात कैद झालाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेतील इंडियानापोलीज येथील एका चालकाने लाल सिग्नल लागल्यानंतरही भरधाव वेगात गाडी चालवत तो मोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि जे घडायला नको तेच घडलं. दोन गाड्यांची धडक झाली आणि ही धडक एवढी भयानक होती की या चौकामधील चारही बाजूने येणाऱ्या गाड्या जागच्या जागी थांबल्या. खरं तर हा अपघात १७ ऑक्टोबर २०२१ रोजी इंडियानापोलीज येथे झाला. या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल हॉग नावाच्या यूट्यूब चॅनेलवरुन शेअर करण्यात आलाय.

सिग्नलवर उभ्या असणाऱ्या एका गाडीच्या डॅशकॅममध्ये म्हणजेच डॅशबोर्डवरील कॅमेरामध्ये या अपघाताची दृष्यं कैद झालीयत. कॅमेरामध्ये दिसते त्याप्रमाणे एक गाडी दुसऱ्या गाडीला मागून जोरदार धडक देते. त्यामुळे समोरची गाडी अगदी हवेत उडाल्याप्रमाणे या अनपेक्षित धक्क्याने उडून समोरच्या एक्सयुव्हीच्या बोनेटवर पडते. सिग्नल तोडण्याच्या प्रयत्न असणाऱ्याचा झालेला अपघात अशा अर्थाच्या कॅप्शनसहीत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.

व्हिडीओ ज्या व्यक्तीच्या कारमधील डॅशकॅममध्ये शूट झालाय त्याने दिलेल्या माहितीनुसार सिग्नलवर गाड्या थांबलेल्या असताना अचानक एका गाडीने मागून दुसऱ्या गाडीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की ज्या गाडीला धडक बसली ती उडून उजवीकडील लेनमधील एक्सयूव्हीच्या बोनेटवर जाऊन पडल्याचं म्हटलं आहे.

या अपघातामध्ये सहा गाड्यांचं कमी अधिक प्रमाणात नुकसान झालं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch car flies over another vehicle after jumping red light in horrifying viral video scsg
First published on: 01-12-2021 at 16:43 IST