Video : ये दोस्ती…दोन मित्रांमध्ये रंगलं फ्राईंग पॅन चॅलेंज

मतभेद विसरत दोन्ही मित्र आले एकत्र

करोना विषाणूचा सामना करण्यासाठी सध्या संपूर्ण देशात लॉकडाउन सुरु आहे. नागरिकांना या काळात घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आलेली आहे. जिवनावश्यक वस्तूंचा अपवाद वगळता इतर सर्व सेवा या काळात बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. होम क्वारंटाइन काळात खेळाडू, सेलिब्रेटी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी, सहकाऱ्यांशी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहे.

भारताचा दिग्गज टेनिसपटू लिएँडर पेसने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर फ्राईंग पॅन चॅलेंज सुरु केलं होतं. यामध्ये तव्याने टेनिस बॉलवर भिंतीवर मारुन जास्तीत जास्त वेळ टोलवत रहायचं आहे. पेसने हा व्हिडीओ टाकत आपल्या चाहत्यांना चॅलेंज दिलं.

त्याचा पुर्वीचा सहकारी महेश भुपतीनेही याला प्रतिसाद देत आपला फ्राईंग पॅनसोबट टेनिस खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला.

मध्यंतरी पेस आणि भुपती यांच्यात अनेक मुद्द्यांवर मतभेद झाले होते. एरवी टेनिस कोर्टवर एकत्र उतरणारी ही भारतीय जोडी तुटली. मात्र सध्याच्या खडतर काळात दोघांनीही आपल्यातले मतभेद विसरुन एकत्र येण्याचं ठरवलं आहे. या निमीत्ताने दोन मित्रांमध्ये सोशल मीडियावर रंगलेल्या संवादाला नेटकऱ्यांनीही चांगलीच पसंती दर्शवली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Watch leander paes and mahesh bhupathi take the frying pan challenge psd

Next Story
…म्हणून हे छायाचित्र इंटनरनेटवर ठरतयं प्रचंड लोकप्रियThis One Photo Sums Up the Difference Between the Generations , viral photo, The internet loves this photo , Loksatta, loksatta news, Marathi, Marathi news
ताज्या बातम्या