भारत संस्कृतीमध्ये विविधता आहे. संस्कृतीमधील है वैविध्य भाषा, वेशभुषा आणि खाद्यपदार्थांमधून दिसते. सहसा पोशाखावरून व्यक्ती कोठून आला आहे हे पटकन ओळखता येते. आपला पोशाख आपल्याबद्दल बरेच काही सांगू शकते. आपल्यापेक्षा वेगळा पोशाख दिसला की सर्वांचे लक्ष वेधले जाते विशेषत: परेदशामध्ये भारतीय पोशाखातील व्यक्ती दिसली तर सर्वजण त्यांच्याकडे कुतूहलाने पाहताता. हीच गोष्ट अनेक सोशल मीडिया इन्फ्युएन्सर्स वापरून व्हिडीओ बनवत आहे. काही दिवसांपूर्वी परदेशात भारतीय साडी परिधान करून फिरणाऱ्या महिलेचा व्हिडीओ चर्चेत आला होता. त्यानंतर आता एका तरुणीने चक्क लुंगी परिधान करून लंडनच्या रस्त्यावर फिरतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये

अलीकडे, इंस्टाग्राम वापरकर्ता @valerydaania हिने दक्षिण भारतातील प्रसिद्ध लुंगी परिधान करून आत्मविश्वासाने लंडनमध्ये फिरताना व्हिडीओ पोस्ट केला. वॅलेरीही तमिळ असून लंडनमध्ये राहते. तिच्या अनोख्या पोशाखाने लोकांचे लक्ष वेधून घेतले. लुंगी परिधान करून फिरणाऱ्या तरुणीला चर्चेचा विषय ठरत आहे. व्हिडीओने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले. काहींच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि कुतूहल दिसले. लोकांच्या प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद करून तो व्हिडीओ तिने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “लंडनमध्ये लुंगी परिधान केली,”
तिने स्टायलिशपणे लुंगी स्वतःभोवती गुंडाळून, साध्या टी-शर्टसह परिधान केला आहे. परफेक्ट लुकसाठी सनग्लासेस घालतेय त्यानंतर आणि तिने शहरात फेरफटका मारण्यास सुरुवात केली. रस्त्यावरुन ये-जा करणारे लोक तिच्याकडे वळून पाहत होते. शेवटी ती एका किराणा दुकानात जाते. लुंगी परिधान केलेली पाहून अनेकजण तिच्याकडे पाहत आहे. त्यांच्या प्रतिक्रिया आपल्या व्हिडीओमध्ये टिपण्याचा प्रयत्न तिने केला आहे. सर्व वयोगटातील लोक तिच्या अनोख्या शैलीने कुतूहलाने नजरेने पाहतात.

हेही वाचा – “एक बार देख लीजिये…….हेल्मेट”, मुंबई पोलिसांनाही लागली ‘हीरामंडी’च्या डॉयलॉगची हवा! हटके स्टाईलमध्ये दिल्या खास टिप्स

इन्स्टाग्राम वापरकर्त्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. एका वापरकर्त्याने टिप्पणी केली, “मला समजत नाही की, कमेंटमधील लोक लुंगी-आउटफिटबद्दल वेडे का आहेत. Balenciaga अक्षरशः टॉवेल विकत आहे आणि त्याला स्कर्ट म्हणत आहे आणि त्याची किंमत ९२५USD आहे.” रस्त्यावरून जाणाऱ्या एक वृद्ध महिलेला तरुणीचा लुंगीमधील लुक आवडल्याचे सांगते. त्याबाबत दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले, “आपल्या सर्वांना आपल्या आयुष्यात अशा आजीची गरज आहे.” तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “अक्का तू खूप मोठ्या सलामीची पात्र आहेस, मला आवडले.”

हेही वाचा – ‘कोणालाही नियमाची पर्वा नाही’, ब्रह्मपुत्रा एक्स्प्रेसमध्ये तिकिट नसलेल्यांची गर्दी, नाराज प्रवाशांनी शेअर केला Video

व्हॅलेरी हिने त्याच लुंगीमध्ये लंडनमध्ये फिरतानाचा आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे, हसत आणि प्रशंसा केली. एका देवाणघेवाणीत, एका माणसाने तिला लुंगीबद्दल विचारले, ज्यावर तिने “दक्षिण भारत” असे उत्तर दिले. ती केरळची आहे का असे विचारल्यावर तिने तिचा तमिळ वारसा असल्याचे सांगितले. एकाने कमेंट केली, “तमिली लोक रॉक्स, अमेरिकन्स शॉक,” तर दुसरा म्हणाला, “स्टनिंग.”