संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ हा काही दिवसांपूर्वीच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. चित्रपटातील गाणी, अभिनय, वेषभुषा आणि डायलॉग सर्वकाही उत्तम प्रकारे मांडले आहे ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे. सोशल मीडियावर लोक चित्रपटातील गाजलेली गाणी आणि डॉयलॉग वापरून व्हिडीओ बनवताना दिसत आहे. अगदी सामन्य व्यक्तीपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी चित्रपटातील डायलॉगची भुरळ पडली आहे. यामध्ये मुंबई पोलिसांचे नाव जोडावे लागेल. कारण नुकतचे हिरामंडी चित्रपटातील डायलॉगवरून प्रेरित होऊन मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावर त्यांच्या फॉलोअर्ससाठी क्रिएटिव्ह पद्धतीने टिप्स शेअर केल्या आहेत.

मुंबई पोलिसांनी अधिकृत इंस्टाग्राम खात्यावर हे डायलॉग शेअर केले आहे. ही पोस्ट शेअर करताना” आझादी शौक नहीं है नवाब साहब, नियम कभी ना तोडने की जंग है,” असे कॅप्शन लिहिले आहे. या पोस्टच्या मदतीने मुंबई पोलिसांचा रस्ता सुरक्षा आणि सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्याचे उद्दिष्ट आहे.

‘एक बार देख लिजिए’ हा केवळ ‘हीरामंडी’ मधला एक लोकप्रिय संवाद नाही तर वेब सीरिजमधील गाण्याचे शीर्षकही आहे. हाच डायलॉग वापरून मुंबई पोलिसांनी बाईक चालवताना हेल्मेट घालणे टाळणाऱ्यांसाठी पहिली टीप दिली आहे: “एक बार देख लीजिये, दीवाना बना दीजिये। चलान काटने के लिए तैयार हैं हम, तो हेल्मेट पहन लीजिए”

दुसरी टीप देताना मुंबई पोलिसांनी लोकांना नवीन पासवर्ड तयार करण्याचे आवाहन केले:“पुराने पासवर्ड दोहराए नहीं जाते, भुला दिए जाते हैं!”
जुना पासवर्ड पुन्हा वापरू नका विसरून जा. नवीन पासवर्ड तयार करून तो लक्षात ठेवा असे मुंबई पोलिसांना सांगायचे आहे.

तसेच ओटीपी कोणाला शेअर करू नये यासाठी देखील एक टिप सांगितले आहे. “ओटीपी बताने और बरबाद होणे के बीच कोई फरक नही होता”

हेही वाचा – मुंबईच्या डान्सिंग कॉपने पुन्हा जिंकले नेटकऱ्यांचे मन! ‘गुलाबी शरारा’वर नोएल रॉबिन्सनबरोबर केला अफलातून डान्स

येथे पोस्ट पहा:

मुंबई पोलिसांचे इंस्टाग्रामवर ७७२ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी ते सोशल मीडियावर अशा मजेदार पोस्ट वारंवार शेअर करतात.

हेही वाचा – “नजर हटी, दुर्घटना घटी!” रिव्हर्स घेताना थेट व्यक्तीच्या अंगावर घातली कार अन्….थरारक अपघात CCTVमध्ये कैद!

‘हीरामंडी’, दरम्यान, शर्मीन सेगल, रिचा चढ्ढा आणि संजीदा शेख यांच्या व्यतिरिक्त मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा आणि अदिती राव हैदरी प्रमुख भूमिका साकरली असून सर्वांच्या अभिनयाचे कौतूक होत आहे आहेत. अदिती राव हैदरीच्या गजगामिनी नृत्यावर चाहते फिदा झाले आहे. संजय लीला भन्साली यांची भाची असलेली शर्मीन सेगल हिला तिच्या वाईट अभिनयासाठी ट्रोल केले जात आहे.