scorecardresearch

भारतात समुद्रातून बांधलाय ‘वॉटर हायवे’? जाणून घ्या या VIRAL VIDEO मागचं सत्य

हा सुंदर हायवे भारतात बनला असल्याचा दावा केला जात आहे.

भारतात समुद्रातून बांधलाय ‘वॉटर हायवे’? जाणून घ्या या VIRAL VIDEO मागचं सत्य
(Photo: twitter/ Hemantg65153835)

Water Highway Built In The Middle Of The Sea In India : हायवेचा एक अतिशय सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या हायवेची खास गोष्ट म्हणजे हा महामार्ग समुद्राच्या मधोमध बांधण्यात आला असून त्यावरून पाणी वाहत आहे. या तरंगत्या महामार्गावरून वाहने जाताना दिसतात.

हा सुंदर हायवे भारतात बनला असल्याचा दावा केला जात आहे. बांधकाम क्षेत्रात दररोज नवनवीन विक्रम होत आहेत. आपल्या देशातील पहिला जल महामार्ग पूर्ण झाला असल्याचं सांगून हा व्हिडीओ लोक मोठ्या प्रमाणात शेअर करू लागले आहेत. हा वॉटर हायवे समुद्राच्या मधोमध बांधला गेलाय. यावरून वाहने आरामात फिरू शकतात. लोक सत्य जाणून न घेता हा व्हिडीओ शेअर करू लागले आहेत. त्याचबरोबर त्यांनी आपल्या पोस्टमध्ये सरकारचं कौतुकही केलंय. पण या व्हिडीओमागचं सत्य काही वेगळंच निघालं.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : भाची हरवल्याची तक्रार करणाऱ्याला इन्स्पेक्टरने चपराक मारली, आता बदली झाली

भारतात इतका सुंदर हायवे नेमका कुठे बनवला गेलाय, याची चर्चा देखील लोक करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ Hemantg65153835 नावाच्या अकाउंटवरून ट्विटरवर शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओमधला सुंदर वॉटर हायवे भारतीयांचं मन जिंकत आहे. ‘अतुल्य भारत, मला शेवटी सर्वात सुंदर जलमार्ग सापडला.’ अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. काही वेळातच त्यावर अनेक लाइक्स आले आणि लोकांनी ते झपाट्याने शेअर करायला सुरुवात केली. ट्विटरवरील काही युजर्सनी हा व्हिडीओ शेअर करून भारत सरकारवर कौतुकाचा वर्षाव देखील सुरू केला.

आणखी वाचा : Taiwan Earthquake: भूकंपाचा कहर, ट्रेनही अगदी खेळण्यासारखी पटरीवर हादरली, पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : तलवारीने केक कापणे महागात पडले; १९ वर्षाच्या बर्थ डे बॉयविरोधात गुन्हा दाखल

पण व्हिडीओची तपासणी केली तेव्हा सर्वकाही उलटं झाले. हा व्हिडीओ भारतातला नसल्याचंच निदर्शनास आलं. सध्या असा कोणताही प्रकल्प भारतात सुरू नाही. तपासाअंती हा व्हिडीओ चीनमधील असल्याचं आढळून आलं. युट्यूबवरही याचे अनेक व्हिडीओ आहेत. तुम्हाला या व्हिडीओमध्ये चिनी भाषेत लिहिलेला संदेश मिळेल. त्यामुळे हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्च रिझल्टमध्ये हा व्हिडीओ चीनची मीडिया कंपनी पीपल्स डेलीच्या फेसबुक पेजवर माहितीसह सापडला.

आणखी वाचा : सापाला फक्त माणूसच नव्हे तर चिंपांझीं सुद्धा घाबरतात, VIRAL VIDEO पाहून पोट धरून हसाल

इथे पाहा खरा व्हिडीओ :

आणखी वाचा : या प्रेमाला कसलीच तोड नाही! आजी-आजोबांच्या जोडप्याचा हा VIRAL VIDEO पाहून तुम्हीही असंच म्हणाल!

वेबसाइटनुसार, हा व्हिडीओ चीनच्या जिआंगशी प्रांतातील योंगवू वॉटर हायवेचा आहे. या महामार्गावरील पाण्याची पातळी १८.६७ मीटरपेक्षा जास्त झाल्यावर त्याचा काही भाग पाण्यात बुडतो. तपासाच्या पुढील टप्प्यात त्याच्याशी संबंधित कीवर्ड शोधले असता बातम्यांसह या महामार्गाचे आणखी बरेच व्हिडीओ सापडतात.

आणखी वाचा : ना लाल माती, ना फड, पण या दोन हरणांची कुस्ती जबरदस्त, पाहा VIRAL VIDEO

रिपोर्ट्सनुसार, पोयांग लेकवरील योंगवू वॉटर हायवे हा ५ किमी लांबीचा रस्ता आहे. पावसाळ्यात जेव्हा पाण्याची पातळी वाढते तेव्हा तलावाचे पाणी रस्त्यावर येते, म्हणून योंगवू रोडला योंगवू वॉटर हायवे म्हणून ओळखले जाते. याला ‘द मोस्ट ब्युटीफुल रोड अंडर द वॉटर’ असं देखील म्हणतात. या रस्त्यावरून जेव्हा एखादी गाडी जाते तेव्हा ते एक सुंदर दृश्य दिसून येतं. त्याचबरोबर तलावाचे पाणी बहुतांश वेळ स्थिर राहिल्याने वाहनांना ये-जा करताना कोणतीही अडचण येत नाही. याशिवाय वाहने अनियंत्रितपणे तलावात पडू नयेत म्हणून रस्त्याच्या दुतर्फा बॅरिकेड्स लावण्यात आले असून,
त्यामुळे वॉटर हायवेच्या नावाने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ भारताचा नसून चीनच्या जिआंगशी प्रांतातील योंगवू वॉटर हायवेचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Fact Check
दावा – भारतात तयार झाला वॉटर हायवे.
सत्य- व्हिडीओ चीनचा आहे.
Rating- False

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या