सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे व्हिडिओ किंवा फोटो व्हायरल होत असतात. क्रिएटिव्ह व्हिडिओ किंवा फोटोंना नेटकऱ्यांची विशेष दाद मिळते. सध्या करोना संकटामुळे लग्न कार्य आणि इतर कार्यक्रमांवर बंधनं आहेत. त्यामुळे मर्यादित लोकांच्या उपस्थितीत सोहळे पार पडत आहे. मोजक्या लोकांच्या उपस्थित पार पडण्याऱ्या सोहळ्यातील वधूवरांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या सोशल मीडियावर एका लग्नाची पत्रिका व्हायरल होत आहे. या लग्न पत्रिकेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. नेटकरी पत्रिका बनवण्याऱ्या व्यक्तीच्या क्रिएटिव्हीटीला दाद देत आहेत. एका ट्विटर यूजरने लग्नाचे मेन्यू कार्ड पोस्ट केले आहे. हे मेन्यू अनेकांनी पाहता क्षणीच शेअर करत व्हायरल केले आहे.
साधारणत: लग्नाच्या पत्रिकेत तुम्हाला नाश्ता, जेवण कधी आहे, याबाबतची माहिती दिली जाते. या पत्रिकेत लग्नात असलेल्या स्वादिष्ट पदार्थांची यादी दिली आहे. दोन इंच रुंद आणि ३० सेमी लांबीच्या लाकडी पट्टीवर लग्नाचा मेन्यू कार्ड छापण्यात आला आहे. या यादीत माशांचा कालवण, फ्राइड राइस, मटण मसाला आणि आंब्याची चटणी यांचा समावेश आहे. ही पत्रिका शेअर करताना ट्विटर युजर्सने लिहिलं आहे की, आधी मोजा आणि नंतर खा. तर दुसऱ्या एका युजर्सने कमेंट्स करताना लिहिलं आहे की, जर कुणाला जास्त खायचं असेल तर या पट्टीचा वापर करू नका.
खरं तर ही पत्रिक २०१३ साली झालेल्या लग्नाची आहे. मात्र सोशल मीडियावर आजही या पत्रिकेची जोरदार चर्चा आहे. पश्चिम बंगालच्या सिलीगुडीतील सुष्मिता आणि अनिमेषच्या लग्नातील हा व्हिडिओ आहे. या दोघांचं लग्न २०१३ साली झालं होतं.