Wedding bride dance video: लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात. अगदी सध्या नवरा-नवरीसुद्धा आपल्याच लग्नात काही ना काही सरप्राइझ देण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक जण आपल्या लग्नाचा दिवस कायम लक्षात रहावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. लग्न म्हटल्यावर भरमसाठ नातेवाईक, पंचपक्वान आणि डीजेचा ताल या गोष्टी आल्याच. प्रत्येक मुलगा किंवा मुलगी आपल्याला कशी बायको हवी यासाठी काही स्वप्न पाहत असतात. अशात आता सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये नवरा नवरीचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, “लग्न उशिरा लागलं तरी चालेल पण असा डान्स झालाच पाहिजे”

लग्नात काही क्षण मजेशीर तर काही भावुक असतात. कधी नवरा-नवरी आनंदाने हसताना दिसतात तर कधी त्यांनी पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात साकार होताना पाहून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रूही येतात. लग्नाचे असे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. लग्नातील भन्नाट व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. हळद असो, मेहंदी असो, संगीत असो, किंवा मुलीला निरोप देतानाचे व्हिडीओ. असे व्हिडीओ नेटकऱ्यांना खूप आवडतात. त्यात नवरा नवरीचे व्हिडीओ तर प्रचंड व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. नवरा नवरीनं जबरदस्त डान्स केला आहे.

यावेळी नवरी-नवरदेवाच्या डान्स मूव्हज् पाहून तर सारेच जण आश्चर्य झाले. रोमॅंटिक डान्स करत असताना त्या दोघांमधली केमिस्ट्री स्पष्टपणे दिसून येत आहे. यावेळी दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडालेले दिसून येत आहेत. यावेळी दोघेही खूप आकर्षक दिसत आहेत. नवरदेव आणि नवरीने सेम रंगाचे कपडे घातले आहेत. नवरा नवरी हा डान्स करत असताना आजुबाजूला असणाऱ्या साऱ्यांच्याच नजरा या जोडप्यांवर होत्या.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ marathi_weddingz या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण नवरा-नवरीच्या डान्सचं कौतूक करताना दिसत आहे.एकानं म्हंटलंय, “लग्न उशिरा लागलं तरी चालेल पण असा डान्स झालाच पाहिजे”