प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या नात्याची औपचारिक घोषणा केली. प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांचा विवाह विंडसर कॅसलमधल्या सेंट जॉर्ज चॅपेलमध्ये मे २०१८ मध्ये पार पडणार असल्याचं केंजिंग्टन पॅलेसमधल्या सूत्रांनी स्पष्ट केलं. या विवाहामुळे ब्रिटनच्या जनतेला पुन्हा एकदा शाही विवाह अनुभवता येणार आहे. हा शाही विवाहसोहळा अनेक अर्थांनी खास आहे. पण, या विवाह सोहळ्यात काही जगावेगळ्या पद्धती आहेत ज्या कदाचित आपल्याला माहितीही नसतील. अनेक इंग्रजी वर्तमानपत्रांनी या पद्धतीसमोर आणल्या आहेत. त्या कोणत्या ते पाहू

… यासाठी राणीच्या हातात नेहमी पर्स असतेच

हे नियम ब्रिटनची राणीसुध्दा मोडू शकत नाही!

सैनिकी पोशाख : लग्नात आपला पोशाख सर्वात महागडा आणि आकर्षक असावा असं कोणत्याही नवरदेवाला वाटेल. पण, ब्रिटनच्या राजघराण्यात लग्नाच्या दिवशी नवरदेवानं सूट घालण्याची परंपरा नाही. या दिवशी राजकुमार खास सैनिकी पोशाखात येतो. त्यामुळे प्रिन्स हॅरी यांना देखील लाल सैनिकी गणवेश परिधान करणं बंधनकारक असणार आहे.
बसण्याची व्यवस्था : ब्रिटनच्या राजघराण्यात लग्न आहे म्हटल्यावर जगभरातील मोठमोठ्या लोकांना आमंत्रणं पाठवली जाणार. त्यामुळे लग्नात बड्या लोकांची मांदियाळी असणार हे नक्कीच. पण, या सगळ्यांची बसण्याची व्यवस्था मात्र खास पद्धतीनं केली जाते. लग्नाच्या दरम्यान चॅपलमध्ये ब्रिटनच्या राजघराण्यातल्या व्यक्ती या नेहमीच उजव्या बाजूला बसतात. तर इतर व्यक्तींना मात्र नेहमी डाव्या बाजूला बसवलं जातं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केक : ख्रिश्चन लग्नात, लग्नांनंतर केक कापण्याची पद्धत आहे. त्यामुळे ‘वेडिंग केक’ला खूप महत्त्व असतं. हा केक कसा असावा, कोणत्या प्रकारचा असावा, हे सारं संबंधित जोडपं ठरवतं. साधारण एकच केक कापण्याची प्रथा आहे. पण येथे आवर्जून दोन केक कापले जातात.
अंगठी घालण्याची परंपरा नाही : लग्नाच्या दिवशी ब्रिटनच्या राजघरण्यात पुरूषांनी अंगठी घालण्याची परंपरा नाही. त्यामुळे लग्नाच्या दिवशी फक्त नववधुच्या हातातच अंगठी असते.