सध्या भारतात बुलडोझर ट्रेंडमध्ये आहे. उत्तर प्रदेशमधून सुरु झालेल्या बुलडोझरचा ट्रेंड मध्य प्रदेशमध्ये गेला आणि आता तो राजधानी दिल्लीपर्यन्तही पोहचला आहे.जहांगीरपुरीमध्ये अवैध कब्जाला हटवण्यासाठी या बुलडोझरचा वापर केला जात आहे. वेगवेगळ्या राज्यातील सरकार अवैध संपत्तीवर बुलडोझर घेऊन कारवाई करत आहे. सध्या चर्चेत असलेल्या या मशीनच खर नाव काय? याची किंमत किती असते? अशा अनेक प्रश्नाची उत्तर जाऊन घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जेसीबी मशीन म्हणजे काय?

जेसीबी ही बहुराष्ट्रीय कंपनी आहे. जे बॅकलोडर्ससारखे मोठे उपकरण तयार करते. जेसीबी कंपनी युनायटेड किंगडमची आहे. या कंपनीची स्थापना १९४५ मध्ये झाली. या कंपनीचे मुख्यालय स्टॅफोर्डशायर, इंग्लंड येथे आहे. मशीन टूल्स बनवणारी जेसीबी ही जगातील तिसरी सर्वात मोठी कंपनी मानली जाते. भारतात जेसीबी मशीनचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. मोठे काम सोपे करण्यासाठी या यंत्राचा वापर केला जातो. मग ते रस्ते बांधणीशी संबंधित असो वा इमारतींच्या बांधकामाशी. जेसीबीचा मुख्य वापर उत्खननात सर्वाधिक होतो. याशिवाय प्रत्येक कामात या यंत्राचा वापर केला जातो.

(हे ही वाचा: अजगराने अचानक गायीच्या वासरावर केला हल्ला, पाय पकडला आणि…; बघा Viral Video)

बुलडोझर असं नाव नाही

बुलडोझरला सर्वसामान्य भाषेत जेसीबी (JCB) असं म्हंटल जात. परंतु जेसीबी हे ही मशीन बनवणाऱ्या कंपनीच नाव आहे तर या मशीनच खर नाव बैकहो लोडर (backhoe loader) असं आहे. जेसीबीच पूर्ण नाव जोसेफ सिरिल बामफोर्ड (Joseph Cyril Bamford) असं आहे.

(हे ही वाचा: बेरोजगारीवर तोडगा! पाटण्यातला ‘ग्रॅज्युएट चायवाली’चा video viral; नोकरी न मिळाल्यानं सुरू केला बिझनेस)

जेसीबीचा रंग पिवळा का असतो?

तुम्ही सर्वांनी जेसीबी मशीन अनेकदा पाहिले असेल. पण त्याचा रंग पिवळा का असतो याचा कधी विचार केला आहे का? पहिली जेसीबी मशीन पांढऱ्या आणि लाल रंगाची होती. पण नंतर त्याचा रंग बदलून पिवळा झाला. याचे मुख्य कारण म्हणजे उत्खननाच्या ठिकाणी आपण सर्वांनी नेहमीच जेसीबी पाहिला आहे. वास्तविक, पिवळा रंग मातीशी संबंधित आहे आणि हा रंग गर्दीतही दुरून उठून दिसतो. त्यामुळे दिवस असो वा रात्र, त्याच्या पिवळ्या रंगामुळे येथे उत्खननाचे काम सुरू असल्याचे दुरूनच कळते. यामुळे जेसीबीचा रंग पिवळा आहे.

(हे ही वाचा: मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये झोपलेल्या व्यक्तीचा फोटो व्हायरल! देसी जुगाड बघून नेटीझन्स झाले आश्चर्यचकीत)

जेसीबी मशीनची भारतात किंमत

जेसीबी कंपनी लोकांच्या गरजा लक्षात घेऊन आपली उपकरणे तयार करते आणि या जेसीबी मशीनची किंमत अतिशय किफायतशीर आणि लोकांच्या बजेटमध्येही असते. भारतात जेसीबी मशीनची किंमत ८ लाख ते ५० लाख रुपये आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is bulldozer machine real name and jcb price in india ttg
First published on: 21-04-2022 at 14:09 IST