तुमच्यापैकी ब-याच जणांकडे लॅपटॉप असेल. या लॅपटॉपच्या दोन्ही बाजूला तुम्ही पाहिले तर तिथे वेगवेगळे स्लॉट तुम्हाला दिसतील. युएसबी, इंटरनेट कनेक्शनसाठी वेगवेगळे स्लॉट लॅपटॉपला असतात. यात एक छोटा आयताकृती छेद किंवा स्लॉट असतो, तुम्हाला माहितीय हा स्लॉट का असतो? बरेचदा या स्लॉटचा वापर कशासाठी असतो याची उकल अनेकांना होत नाही. तर हा छोटा स्लॉट असतो तो लॅपटॉपच्या सुरक्षेसाठी.

वाचा : स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठी ‘या’ गोष्टी नक्की करा

लॅपटॉपची चोरी होऊ नये यासाठी लॅपटॉपच्या कोप-यात एक छोटासा स्लॉट दिलेला असतो. काही लॅपटॉपच्या चार्जिंग पॉईंट जवळ तर काही लॅपटॉच्या युएसबीच्या पोर्टजवळ हा पॉईंट असतो. ‘लॅपटॉप लॉक’ या स्लॉटमध्ये जोडायचे असते. त्यासाठी  लॅपटॉप लॉकला मोठी वायरदेखील असते. याने तुम्ही  लॅपटॉप एखाद्या वस्तूला जखडून ठेऊ शकता. आपण साखळीने एखादी वस्तू बांधून ठेवतो तशाच प्रकारे लॅपटॉपही जोडून ठेवता येतो. पण हे लॉक अद्यावत तंत्रज्ञानानेयुक्त आहे. एक युनिक पासवर्डद्वारे तुमचा लॅपटॉप या लॉकमध्ये जखडला जातो. यासाठी लॅपटॉपच्या आतमध्ये तशी गुंतागुतीची प्रणाली तयार करण्यात आली असते. जोपर्यंत अचूक पासवर्ड टाकला जात नाही तोपर्यंत हे टाळे उघडता येणं अशक्य आहे . त्यामुळे, लॅपटॉपची चोरी करण्याचा प्रश्नच येत नाही. साधरण २००० नंतर आलेल्या लॅपटॉपमध्ये ही प्रणाली पाहायला मिळेल. ‘के स्लॉट’ म्हणूनही हा आयकाकृती स्लॉट ओळखला जातो. लॅपटॉपची चोरी होऊ नये यासाठी त्याचा उपयोग केला जातो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाचा : ट्विटर अकाऊंट ‘हॅक’ झाले तर काय कराल?