उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजपा सरकार स्थापन करताना दिसत आहे. भाजपाला स्पष्ट बहुमत मिळत असल्याने त्यांनी दिलेल्या आश्वासनाकडे लक्ष वेधलं जात आहे. निवडणुका जाहीर होताच भाजाने जाहिरनाम्यात अनेक आश्वासनं दिली होती. त्यामुळे येत्या पाच वर्षात भाजपा सरकारला ही आश्वासनं पूर्ण करावी लागणार आहेत. कोण कोणती आश्वासनं दिली होती पाहूयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  • शेतकऱ्यांना मोफत वीज: भाजपने पाच वर्षांसाठी सर्व शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले आहे. भाजपने सरकार आल्यास १४ दिवसांत उसाचे पेमेंट करण्याचे आश्वासन दिले आहे. विलंब झाल्यास व्याज दिले जाईल.
  • गरीब मुलींच्या लग्नासाठी मदत: मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजनेंतर्गत आर्थिक मदत १५ हजारांवरून २५ हजार रुपये करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सामूहिक विवाह अनुदान योजनेंतर्गत गरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.
  • मोफत सिलेंडर: पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना होळी आणि दीपावलीच्या दिवशी दोन मोफत LPG सिलिंडर दिले जातील.
  • रोजगार: पाच वर्षात ३ कोटींहून अधिक नोकऱ्या देण्याचा दावा करत भाजपा पुढील पाच वर्षात प्रत्येक कुटुंबाला किमान एक रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी देणार आहे.
  • मोफत स्कूटी: राणी लक्ष्मीबाई योजनेंतर्गत महाविद्यालयीन गुणवंत विद्यार्थिनींना स्वावलंबी बनवण्यासाठी मोफत स्कूटी देण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे.

VIDEO: भाजपाच्या विजयासाठी ‘मिरची यज्ञ’, ११ पुरोहितांनी १ क्विंटल मिरच्यांची आहुती देत योगींना मुख्यमंत्री होण्यासाठी दिल्या शुभेच्छा

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What up bjp manifesto promised people for next five years rmt
First published on: 10-03-2022 at 13:06 IST