भारतामध्ये तूफान प्रसिद्धी मिळालेल्या व्हॉट्स अॅप या मेसेजिंग अॅपमध्ये लवकरच दोन नवे फीचर्स येणार आहे. GIF आणि मीडिया फाईल शेअररिंग संदर्भातील हे दोन नवे फीचर्स असणार आहेत. नोव्हेंबर २०१६ मध्ये व्हॉट्स अॅपने GIF फाईल सपोर्ट सुरू केला होता. आता व्हॉट्स अॅप्स आपल्या अँड्राईड युजर्सना Giphy library उपलब्ध करून देणार आहे. यातील GIF फाईल्स युजर्स चॅटिंग करताना वापरू शकणार. तर इमेज शेअरिंगची मर्यादाही वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता युजर एकाच वेळी १० ऐवजी ३० एमेज एकत्र पाठवू शकतो.
वाचा : चुकून पाठवलेले व्हॉट्सअॅप मेसेज आता एडिट करता येणार
व्हॉट्स अॅपचे जवळ जवळ १ अब्ज युजर्स आहेत. २०१६ मध्ये व्हॉट्स अॅपने व्हिडिओ कॉलिंगचे नवे फीचर आणले होते. त्यानंतर जीआयएफला सपोर्ट करणारे नवे फीचर व्हाट्स अॅपने आणले. या वर्षात व्हॉट्स अॅपने थोडे बदल करत आणखी दोन नवे फीचर्स आणले आहे. या संदर्भातील अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार आहे. चॅटिंगदरम्यान फॉरवर्ड होणारे GIF फाईल्स खूपच प्रसिद्ध होत आहे. आणि हेच लक्षात घेऊन Giphy library उपलब्ध होणार आहे. एमोजीच्या पर्यायाशेजारीच GIF फाईल्स पाठवण्याचा पर्याय उलब्ध असणार आहे.
Viral : मोबाईल क्रमांक लक्षात ठेवण्यासाठी महिलांची अनोखी शक्कल
तर इमेज शेअरिंगच्या मर्यादा वाढवण्यात येणार आहेत. आतापर्यंत युजर्स एकाच वेळी फक्त १० इमेज पाठवू शकत होता पण लवकरच ही मर्यादा ३० पर्यंत करण्यात येणार आहे. यामुळे युजर्सचा वेळही वाचणार आहे.