मराठी खाद्यपदार्थ जगभरात न्यायचे असतील तर काय केलं पाहिजे? याचा एक फंडाच राज ठाकरेंनी एक मुंबईत सांगितलं. शालिनी ठाकरे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज ठाकरे यांची उपस्थिती होती तसंच विठ्ठल कामत यांचीही उपस्थिती होती. कामत या रेस्तराँची चेन उघडणारे विठ्ठल कामत यांचं कौतुकही राज ठाकरे यांनी केलं. तसंच मराठी पदार्थ जगभरात पोहचले पाहिजेत यासाठी काय केलं पाहिजे हेदेखील सांगितलं.

काय म्हणाले राज ठाकरे?

विठ्ठल कामत यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. कारण खाद्य पदार्थ या विषयावर विठ्ठल कामत हे एक हजार तास बोलू शकतात. महाराष्ट्रातल्या सर्वच माता-भगिनींबाबत माझं एक म्हणणं आहे. मराठी खाद्यपदार्थांचं एखादं रेस्तराँ मध्ये गेलो तर कुठे जातो? इंडियन रेस्तराँमध्ये जातो. तिथे मिळणारा कुठला पदार्थ मराठी असतो? इंडियन रेस्तराँमध्ये मिळणारे पदार्थ मोगलाई किंवा पंजाबी असतात. तिथे एकही पदार्थ मराठी नसतो.

सिंगापूरच्या रेस्तराँमध्ये इंडियन ब्रेक फास्ट मिळत नाही

मी एकदा सिंगापूरला गेलो होतो. ते सकाळी ९ वाजता उघडतं आणि रात्री ११ ला बंद होतो. त्या रेस्तराँमध्ये सकाळी ९ वाजल्यापासून जगातल्या प्रत्येक देशातला ब्रेक फास्ट मिळतो. तुम्ही फक्त नाव घ्या, ब्रिटिश, इटालियन, फ्रेंच, मेक्सिकन नाव घ्या सगळ्या देशातले ब्रेक फास्ट मिळतात. पण इंडियन ब्रेक फास्ट मिळत नाही. का मिळत नाही? इडली द्यायची की पराठे द्यायचे की काय द्यायचं? हेच कळत नाही.

१९९५ ला झुणका भाकर योजना सुरु झाली होती ती का बंद पडली?

बोलायला आणि ऐकायला छान वाटतं आहे. आमची विविधता वगैरे बोलायला छान आहे. एक परवलीचं वाक्य माता-भगिनींचं वाक्य असतं की आमच्याकडे वेगळ्या प्रकारचं असतं. म्हणजे काय? १९९५ ला झुणका-भाकर योजना आली होती. ती योजना फसली का? कारण प्रत्येक ठिकाणचा झुणका वेगळा होता. कोकणातला, विदर्भातला, मराठवाड्यातला सगळीकडचा झुणका वेगवेगळ्या चवीचा होता. आज आपल्याकडे मसालेही खूप प्रकारचे आहे. मालवणी रेस्तराँ आहेत. मात्र प्रत्येक ठिकाणची चव वेगळी आहे. जेव्हा तुम्ही ग्राहकाचा विचार करता तेव्हा एकाच प्रकारची गोष्ट लोकांपर्यंत पोहचवणं आवश्यक आहे. आता आमच्या शिवाजी पार्कला मालवणी कट्टा नावाचं रेस्तराँ आहे मी विचारलं कोण बनवतं जेवण? तर तो म्हणाला आई, बहीण आणि मामा. त्यांची एक वेगळी चव असते.

मॅक डोनाल्डचा बर्गर जगभरात एकाच चवीचा

जगात कुठेही गेलात तर मॅक डोनाल्ड्सचा बर्गर खाताना एक चव लागते. त्याचा एक रिसर्च केलेला आहे. आपल्याकडे वडा-पावची चवही बदलते. आपल्याकडे मिसळीची चवही बदलते. आपण त्यावर असं सांगतो की आमच्याकडे दहा प्रकारच्या मिसळी मिळतात, कारण आमच्याकडे विविधता आहे. त्या विविधतेच्या नावाखाली आपण बाहेर पोहचत नाही. जे जगभर पोहचलेले लोक आहेत त्यापैकी आपल्या देशातले फक्त पंजाबी आणि दाक्षिणात्य लोक आहेत ज्यांचे खाद्यपदार्थ हे बाहेरच्या देशातही खाल्ले जातात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जगभरात मराठी पदार्थ मिळतात का?

विठ्ठल कामत यांनीही आणलं काय? तर इडली आणली. तुम्ही जगात कुठेही गेलात, अमेरिका, युरोप कुठेही गेलात तरीही तुम्हाला इडली-डोसा मिळणार. मराठी पदार्थ मिळतो का? नाही कारण त्याला एक चव नाही. कारण मराठी पदार्थ मिळतो का? चौकटीत बसत नाही. प्रत्येक वेळी वेगळे प्रयोग होतात. जेव्हा तुम्ही लोकांसमोर गोष्टी आणता तेव्हा त्याची चव सारखी असली पाहिजे हे लक्षात ठेवा, असं केलं तरच मराठी पदार्थ जगभरात पोहचतील हे विसरु नका.