Who is Sadhvi Harsha Richariya: उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे महाकुंभ मेळा २०२५ ची सुरुवात झाली असून कोट्यवधी लोक आध्यात्मिक अनुभूती घेण्यासाठी इथे पोहोचले आहेत. विदेशी नागरिकांसह देशभरातून लाखो भाविक याठिकाणी जाऊन दर्शन घेणार आहेत. १३ जानेवारी रोजी पहिल्या दिवशी सुमारे दीड कोटी लोकांनी शाही स्नानाचा लाभ घेतला. संपूर्ण महाकुंभमध्ये जवळपास ४० कोटी भाविक सामील होण्याची शक्यता आहे. महाकुंभ मेळ्याची सुरुवात होत असताना एका सुंदर साध्वीचा व्हिडीओ व्हायरल झाला. इंटरनेटवर याच साध्वीची चर्चा आहे. पण आता एक वेगळा मुद्दा समोर आला आहे. ही साध्वी नसून डिजिटल कंटेंट क्रिएटर असल्याचे सांगितले जात आहे. काही युजर्सनी तिचे जुने व्हिडीओही समोर आणले आहेत. ही साध्वी नेमकी कोण? हे जाणून घेऊ.

ती साध्वी कोण?

प्रयागराजमध्ये साध्वीच्या वेशात पोहोचलेल्या तरुणीचे नाव हार्षा रिचारिया असल्याचे कळते. महाकुंभमध्ये पोहोचल्यानंतर तिने काही वृत्तवाहिन्यांना मुलाखती दिल्या. ज्यामध्ये ती स्वतःला निरंजनी आखाडाचे महामंडलेश्वर स्वामी श्री कैलाशनंदगिरी जी महाराज यांची शिष्य असल्याचे सांगते. तिच्या इन्स्टाग्राम बायोमध्येही तिच्या आध्यात्मिक आवडीबद्दल लिहिलेले आहे. तसेच उत्तराखंडशी असलेले तिचे नातेही तिने सांगितले आहे.

हे वाचा >> Maha Kumbh Mela 2025: महाकुंभची पुराणकथा, इतिहास आणि ज्योतिषशास्त्र काय सांगते?

हर्षा रिचारिया ३० वर्षांची असून ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर आहे. दोन वर्षांपूर्वी तिने साध्वी होण्याचा निर्णय घेतला असल्याचे ती मुलाखतीमध्ये सांगत असते. पण सोशल मीडिया युजर्स तिच्या जुन्या कामाचा दाखला देत आहेत. ती सूत्रसंचालक असून अनेक इव्हेंटमध्ये तिने काम केले आहे.

हे ही वाचा >> कुंभ आणि महाकुंभ मेळ्यामध्ये फरक काय? कुंभ मेळ्याचे किती प्रकार असतात?

सोशल मीडियाव होतेय टीका

सोशल मीडियावर मात्र हर्षा रिचारियावर बरीच टीका होत आहे. दोन महिन्यांपूर्वीच तीने एका इव्हेंटमध्ये काम केले होते. मग ती दोन वर्षांपासून साध्वी कशी काय आहे? असे प्रश्न विचारले जात आहेत. तर हर्षाने केवळ प्रसिद्धीसाठी धर्माचा आधार घेतला, असाही आरोप तिच्यावर केला जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हर्षा रिचारियाचे सोशल मीडिया हँडल्स काही युजर्सनी मागे जाऊन चाळले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ती आध्यात्मिक पोस्ट शेअर करत असली तरी दोन वर्षांपासून तिचा साध्वी असण्याचा दावा अनेकांनी खोडून काढला आहे. इन्स्टाग्रामवर तिचे जवळपास सात लाख फॉलोअर्स आहेत. अडीच हजाराहून अधिक पोस्ट तिने टाकल्या आहेत.