जर तुम्ही पिझ्झा प्रेमी असाल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा पिझ्झा ऑर्डर करता, त्यावेळी पिझ्झाच्या मध्यभागी एक छोटा प्लॅस्टिकचा टेबल ठेवलेला दिसला असेल. पिझ्झासोबत हा छोटा प्लॅस्टिकचा टेबल का देत असतील ? आणि याचा वापर नक्की कशासाठी करायचा असे एक ना अनेक प्रश्न तुमच्या मनात आले असतीलच. याचं उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला इतर कुणाला विचारावं लागणार नाही. कारण सोशल मीडियावरील नेटिझन्सनी याचं उत्तर शोधून काढलंय. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना इतका आवडलाय की, आतापर्यंत २० मिलियनपेक्षाही जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय. नक्की काय आहे या व्हिडीओमध्ये हे तुम्हाला प्रत्यक्ष पाहिल्यानंतरच कळेल.

पिझ्झा आर्डर केल्यानंतर बॉक्समध्ये आपण अनेकदा छोट्या आकारचे टेबल दिलेलं पाहत असतो. कधी कधी पिझ्झाच्या बॉक्समध्ये छोट्या आकारचे टेबल व्यतिरिक्त छोटे स्टूल, छोट्या खुर्च्या सुद्धा देण्यात येत असतात. याला ‘पिझ्झा सेवर’ असं म्हटलं जातं. याला वेगवेगळ्या नावाने सुद्धा ओळखलं जातं. कुणी याला बॉक्स टेंट, पिझ्झा ट्रायपॉड, पिझ्झा टेबल, पिझ्झा चेअर, असं देखील म्हणतात. पण बॉक्समध्ये पिझ्झाच्या मध्यभागी लावून दिलेलं पिझ्झा टेबल नक्की कशासाठी दिलं जातं? असा प्रश्न अनेकांना पडत होता. त्याचा वापर सुद्धा करायचा यावरून सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगत होती. परंतू नेटकऱ्यांनी या प्रश्नाचं उत्तर शोधलंय. या प्रश्नाचं उत्तर देणारा एक मजेदार व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. हा व्हिडीओ पाहून सारेच जण चकित होऊ लागले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, आर्डर केलेल्या पिझ्झाच्या मध्यभागी लावलेलं पिझ्झा टेबल हाताने उचललं जातं आणि ते पिझ्झाच्या एका तुकड्यावर ठेवून हाताने ओढत तुकडा तोडला जातो. पिझ्झासोबत आलेल्या छोट्या टेबलचा असाही वापर करू शकतो, हे पाहून सोशल मीडियावरील नेटकऱ्यांना नवी कल्पना मिळाली. ‘या छोट्या टेबलाचा ‘पिझ्झा कटर’ म्हणून वापर होऊ शकतो, असा विचार आपण का केला नाही?’ असा प्रश्न विचारत या व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.

shazabfarooqui नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. नेटकऱ्यांना हा व्हिडीओ खूपच आवडलाय. प्रत्येक जण हा व्हिडीओ वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर करत पिझ्झासोबत आलेल्या छोट्या टेबलचा वापर असा करू शकतो, हे सांगताना दिसून येत आहेत.

सध्या सोशल मीडियावर एका व्हिडीओने तुफान धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत २० मिलियनपेक्षाही जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय. अनेकजण या व्हिडीओवर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.

खरं तर, बॉक्समधील पिझ्झाचे तुकडे विस्कळीत होऊ नये म्हणून हे ‘पिझ्झा सेवर’ बॉक्समध्ये पिझ्झाच्या मध्यभागी लावून दिलं जातं. ‘पिझ्झा सेवर’च्या तीन काड्या पिझ्झाच्या मधोमध लावून ठेवल्याने होम डिलिव्हरीपर्यंत पिझ्झा व्यवस्थित राहतो, हे यामागचं खरं कारण होय. परंतू सोशल मीडियावरील नेटकऱ्यांनी या पिझ्झा सेवरचा असाही वापर करता येऊ शकतो, हे दाखवून दिलंय.