Radhika Merchant Anant Ambani Viral Video: उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचा साखरपुडा नुकताच पार पडला आहे. अनंत अंबानीचा साखरपुडा राधिका मर्चंटशी झाला आहे. त्या दोघांच्या साखरपुड्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. अंबानींच्या शाही साखरपुडा सोहळ्यातील अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. साखरपुड्यात अंबानींच्या श्वानाने अंगठ्या आणणे ते पूर्ण कुटुंबाने केलेल्या डान्सपर्यंत अनेक व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. अशातच नीता अंबानी होणाऱ्या सुनेला ओवाळताना मुकेश अंबानी यांनी केलेली एक कृती सध्या खूप व्हायरल होत आहे.

मानव मंगलानी यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की नीता अंबानी होणाऱ्या सुनबाई राधिका मर्चंटच्या स्वागताला ओवाळणीचे ताट घेऊन उभ्या आहेत. पारंपरिक आणि रीतीरिवाजानुसार गुरुजीच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या नवीन सूनचं स्वागत करण्यात येतं आहे. नीता अंबानींच्या शेजारी मुकेश अंबानी व थोरली सून श्लोका उभी आहे. तर अंबानींचा मोठा लेक आकाश हा पाठी उभा आहे. यावेळी अंबानी कुटुंबाचे जावई आनंद पिरामलच्या खांद्यावर हात ठेवून आकाश उभा आहे. हे पाहताच अंबानी आकाशचा हात खेचून त्याला श्लोकाच्या बाजूला उभे राहण्यासाठी इशारा करतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंबानींनी लेकाचा हात खेचला अन्..

दरम्यान, अंबानींच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानी त्या अनंत आणि राधिका यांचा साखरपुडा पार पडला. त्यांच्या साखरपुड्यासाठी अतिशय जय्यत तयारी करण्यात आली होती. अगदी राजेशाही थाटात त्या दोघांचा साखरपुडा पार पडला. अनंत आणि राधिका गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. या शाही साखरपुडयाला बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित होते.